नायजेरियन तरुणाकडून साडेसहा लाखांचे १३० ग्रॅम कोकेन हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 12:14 PM2019-10-08T12:14:18+5:302019-10-08T13:50:39+5:30

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका नायजेरियन तरुणाला पकडून त्यांच्याकडून साडेसहा लाख रुपये किंमतीचे १३० ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. मिचेल एडिसन जान (रा. वर्कतुंड आंगन, मोर्या पार्क, पिंपळे गुरव) असे त्याचे नाव आहे.

Crime news : 130 grams of cocaine seized from Nigerian youth | नायजेरियन तरुणाकडून साडेसहा लाखांचे १३० ग्रॅम कोकेन हस्तगत

नायजेरियन तरुणाकडून साडेसहा लाखांचे १३० ग्रॅम कोकेन हस्तगत

Next

पुणे : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका नायजेरियन तरुणाला पकडून त्यांच्याकडून साडेसहा लाख रुपये किंमतीचे १३० ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. मिचेल एडिसन जान (रा. वर्कतुंड आंगन, मोर्या पार्क, पिंपळे गुरव) असे त्याचे नाव आहे.

याबाबत गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना माहिती मिळाली होती. त्यांनी अमली पदार्थविरोधी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. एक नायजेरियन बोपोडीजवळ अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मध्यरात्री साडेबारा वाजता बोपोडी जल शुद्धीकरण केंद्राजवळ सापळा लावला. यावेळी मोटारसायकलवरुन आलेल्या मिचेल याला पोलिसांनी अडविले. त्याची झडती घेतली असता त्याकडे १३० ग्रॅम कोकेन, ३७ हजार ५०० रुपये रोख सापडली. कोकेनची विक्री करुन हे पैसे त्याच्यकडे आले असावेत असा पोलिसांना संशय आहे. त्याशिवाय त्याच्याकडून पासपोर्ट व इतर साहित्य, दुचाकी असा ७ लाख ६८ हजार ८०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निलेश विठ्ठल महाडिक यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली असून खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय टिकोळे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Crime news : 130 grams of cocaine seized from Nigerian youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.