शिक्षकाच्या नोकरीचे आमिष दाखवून 24 लाखांचा गंडा ; संस्थेचा उपकार्याध्यक्ष केतन लावाटे गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 15:30 IST2018-10-29T15:30:37+5:302018-10-29T15:30:51+5:30
हायस्कूल मध्ये शिक्षकाची नोकरी लावतो असे सांगून दोन तरुणांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

शिक्षकाच्या नोकरीचे आमिष दाखवून 24 लाखांचा गंडा ; संस्थेचा उपकार्याध्यक्ष केतन लावाटे गजाआड
बदलापूर - बदलापूर गावातील बदलापूर हायस्कूल मध्ये शिक्षकाची नोकरी लावतो असे सांगून दोन तरु णांची फसवणूक करणारा बदलापूर हायस्कूल या संस्थेचा उपकार्याध्यक्ष केतन लवाटे (40) याला पोलीसांनी अटक केली आहे. लवाटे याने शाळेत नोकरीला लावतो असे सांगून अनेकांना गंडा घातला आहे.
कल्याण येथे राहणारे सुनील चौधरी आणि बदलापूर कात्रप येथील शशिकांत पवार ह्या दोघांकडून केतन लवाटे याने मी बदलापूर हायस्कूलचा उपकार्यकारी अध्यक्ष असून तुम्हाला नोकरीला लावतो असे सांगून त्याने दोन वर्षांपूर्वी प्रत्येकी बारा लाख घेतले होते. मात्र त्यांना नोकरी देण्यास लवाटे टाळाटाळ करत होता. काही दिवसांनी त्यांनी जास्त तगादा लावल्यावर त्यांना बदलापूर हायस्कूलच्या लेटरहेड तयार करून शिक्षकाचे नियुक्तीपत्र दिले. मात्र हे नियुक्तीपत्न बोगस असल्याचे चौधरी आणि पवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी केतन लवाटे कडे पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र लवाटे हा पैसे परत देण्यास टाळाटाळ करत असल्याने अखेर दोघांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात लवाटे याच्याविरु द्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलीसांनी तक्रारीची दखल घेत लवाट याला लागलीच अटक केली आहे.
अवळून त्याला जेरबंद केले आहे. त्याला शनिवारी उल्हासनगर न्यायालयात हजर केले असता त्याला कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासात आणखी फसवणूकीची अनेक प्रकरणो समोर येण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्न यांनी व्यक्त केली आहे. तसेच केतन लवाटे याने जर आणखीन इतर कोणाचीही फसवणूक केली असेल तर त्यांनी तातडीने बदलापूर पश्चिम पोलिसांची संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.