Crime: आधी पाच वर्षाच्या लेकीची हत्या, नंतर बॉयफ्रेंडसोबत रात्रभर हॉटेलमध्ये पार्टी; कसं फुटलं बिंग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 16:57 IST2025-07-16T16:57:07+5:302025-07-16T16:57:51+5:30

Marathi Crime News: आपले दुसऱ्या व्यक्तीसोबत असलेले प्रेमसंबंध मुलगी सगळ्यांना सांगेन आणि भांडाफोड होईल... या भीतीपोटी एका महिलेने पोटच्या पाच वर्षाच्या मुलीची हत्या केली. 

Crime: First the murder of a five-year-old girl, then an all-night party in a hotel with her boyfriend; How did the binge break out? | Crime: आधी पाच वर्षाच्या लेकीची हत्या, नंतर बॉयफ्रेंडसोबत रात्रभर हॉटेलमध्ये पार्टी; कसं फुटलं बिंग?

Crime: आधी पाच वर्षाच्या लेकीची हत्या, नंतर बॉयफ्रेंडसोबत रात्रभर हॉटेलमध्ये पार्टी; कसं फुटलं बिंग?

Crime news in Marathi: प्रेमात लोक काय करतील याचा नेम नाही... गेल्या काही काळात तर या घटनांचे पेवच फुटले आहे. याच घटनांमध्ये आणखी एका घटनेची भर पडली आहे. एका महिलेने आपले प्रेमसंबंध पोटच्या लेकीमुळे लोकांना कळतील... प्रेमसंबंधात दुरावा येईल म्हणून पाच वर्षाच्या मुलीचीच हत्या केली. कळस म्हणजे मुलीचा मृतदेह बॅगेत टाकून महिला बॉयफ्रेंडसोबत रात्रभर हॉटेलमध्ये पार्टी करत बसली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये ही घटना समोर आली आहे. रोशनी खान असे मुलीची हत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.  तिचे उदित जायसवाल याच्यासोबत प्रेमसंबंध आहेत. 

लेकीच्या हत्येचा विचार आला अन्

रोशनीचे शाहरुख नावाच्या व्यक्तीसोबत झालेले आहेत. तर उदित यांच्यासोबत विवाहबाह्य संबंध आहेत. उदितसोबतचे संबंध मुलगी पती आणि इतर व्यक्तींना सांगेन अशी भीती रोशनीला होती.  त्यात त्या मुलीला वडिलांसोबत राहायचे होते. तिचा उदित सोबत राहण्यास विरोध होता.त्यातूनच तिच्या हत्येचा विचार रोशनीच्या मनात आला. 

बॉयफ्रेंडसोबत रात्रभर केली पार्टी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशनीने उदितसोबत मिळून तिच्या मुलीची हत्या केली. आधी मुलीला मारहाण केली. नंतर पायाने तिचा गळा दाबून हत्या केली. मुलीची हत्या केल्यानंतर रोशनी आणि उदितने मुलीचा मृतदेह एका पिशवीमध्ये टाकला. ती पिशवी एका खोक्यात टाकली. 

काही तासांनंतर जेव्हा खोक्यातून वास यायला लागला, तेव्हा तिने तो मृतदेह बाहेर काढला आणि एसीसमोर ठेवला. त्यानंतर ती बॉयफ्रेंड उदितसोबत लखनौतील एका हॉटेलमध्ये गेली आणि दोघांनी रात्रभर पार्टी केली. 

रोशनीनेच पोलिसांना केला कॉल

त्यानंतर रोशनीने पोलिसांना कॉल केला आणि सांगितले की मुलीची तिच्या पतीने हत्या केली. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू केला. पण, रोशन सतत माहिती देताना चुका करत असल्याचे बघून तिच्यावर संशय आला. पोलिसांनी तिची चौकशी केली. त्यात तिने बॉयफ्रेंडसोबत मिळून हत्या केल्याची कबुली दिली. 

Web Title: Crime: First the murder of a five-year-old girl, then an all-night party in a hotel with her boyfriend; How did the binge break out?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.