शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

संतापजनक! "इथे राहायचं असेल तर तुला द्रौपदी होऊन राहावं लागेल"; पतीने दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 9:12 AM

Crime News : लग्नाला अवघा एक महिना झाल्यावर पतीने आपल्या पत्नीला घराबाहेर काढल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - देशभरात महिलांवरील अत्याचाऱाच्या, बलात्काराच्या अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक संतापजनक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. "इथे राहायचं असेल तर तुला द्रौपदी होऊन राहावं लागेल" अशी धमकी एका नवविवाहितेला तिच्या पतीने आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे. लग्नाला अवघा एक महिना झाल्यावर पतीने आपल्या पत्नीला घराबाहेर काढल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

गुजरातच्या अहमदाबादमधील नवविवाहितेने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. तिने आपल्या तक्रारीत पतीने आपला मोठा भाऊ आणि वडिलांसोबत शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. मात्र यासाठी नकार दिला असता त्याने घरातून बाहेर काढलं. जर तुला इथे आमच्यासोबत राहायचं असेल तर द्रौपदी बनून राहावं लागेल असं पतीने म्हटल्याची माहिती पीडित महिलेने पोलिसांना दिली. पीडित महिलेने आपल्या तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधल्या चांदखेडा परिसरात राहणाऱ्या महिलेचं महिन्याभरापूर्वीच मोठ्या धूमधडाक्यात लग्न झालं होतं. 

नव्या संसाराची स्वप्नं घेऊन ती सासरी आली होती. मात्र दोन तीन दिवसांतच तिची सर्व स्वप्न धुळीला मिळाली. लग्नानंतर तिचा पती तिला छोट्या छोट्या कारणांवरून थेट मारहाण करू लागला. त्यामुळे तिला आपण जणू नरकातच आलो आहोत असं वाटायला लागलं होतं. काही दिवसांपूर्वी घरात असताना तिच्या पतीने तिला वडिलांच्या खोलीत जाण्यास सांगितलं. तसेच तिथेच झोप असं देखील म्हटलं. हे ऐकल्यावर नवविवाहितेला खूप मोठा धक्का बसला. तिने त्याला विरोध केला. तेव्हा त्याने तिला धमकी दिली की इथे राहायचं असेल तर द्रौपदी बनून राहावं लागेल.

पतीच्या मोठ्या भावानेही एक दिवस तिच्या खोलीत येऊन तिच्यावरजबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्यावर त्याने तिला मारहाण केली. तसंच हे कळल्यावर तिचा पती आणि सासऱ्यांनीही तिला बेदम मारहाण केली आणि घरातून हाकलून दिलं. त्यानंतर पीडितेने पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला आहे. आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि डॉक्टर्स कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र याच दरम्यान एक भयंकर घटना समोर आली आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याने एका नर्सला तिच्या कुटुंबियांनी घराबाहेर काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

नात्याला काळीमा! कोरोना झाला म्हणून नर्सला काढलं घराबाहेर; सासरच्यांनी केली तब्बल 10 लाखांची मागणी

गुजरातमधील अहमदाबादच्या इसनपूर भागात ही घटना घडली आहे. एका नर्सला कोरोना झाल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला घराबाहेर काढलं. तसेच सासरच्या मंडळींनी तिला घरात पुन्हा घेण्यासाठी तिच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी केली आहे. ज्यामुळे नर्स सध्या आपल्या माहेरी राहत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील इसनपूर भागात राहणाऱ्या 27 वर्षीय नर्सने याबाबत खोखरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत खोखरामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीशी 2020 मध्ये तिचा विवाह झाला. नर्सने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, नर्सचा ज्यावेळी विवाह झाला त्यावेळपासूनच ती मणिनगर येथील एलजी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती. सासरकडील मंडळींना तिचं हे काम करणं पसंत नव्हतं. त्यामुळे तिच्या सासरचे लोक तिला त्रास देत होते. एप्रिल 2020 मध्ये जेव्हा या नर्सला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समजलं त्यावेळी तिच्या पतीसह सासरच्या लोकांनी तिला घराबाहेर काढलं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीahmedabadअहमदाबादPoliceपोलिस