संतापजनक! अवघ्या १५ महिन्याच्या चिमुरडीस मारहाण करणाऱ्या काकीविरोधात गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 08:30 PM2021-09-16T20:30:43+5:302021-09-16T20:38:18+5:30

तिने मोबाईलमधील शूटिंग पाहिली असता त्यात रेश्मा ही मुलीला हाताने बेदम मारत असल्याचे तसेच दारा जवळ लाथेने मारत असल्याचे दिसून आले.

Crime against aunt who beat up 15-month-old kid | संतापजनक! अवघ्या १५ महिन्याच्या चिमुरडीस मारहाण करणाऱ्या काकीविरोधात गुन्हा 

संतापजनक! अवघ्या १५ महिन्याच्या चिमुरडीस मारहाण करणाऱ्या काकीविरोधात गुन्हा 

Next
ठळक मुद्दे रेश्मा फिरोज शेख (३२) हिची जाऊ आसमा (२३) जानेवारी पासून एकत्र कुटुंबात पुन्हा सासऱ्याच्या घरी रहायला आली.नया नगर पोलिस ठाण्यात तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीरारोड - मीरारोडच्या नयानगर भागात एकत्र कुटूंबात राहणाऱ्या जाऊने दिर व भावजय घर सोडून जावेत म्हणून त्यांच्या  १५ महिन्याच्या चिमुरडीला रक्त येईपर्यंत लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करत असल्याचा संतापजनक प्रकार केला आहे. नया नगर पोलिस ठाण्यात तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नया नगर मधील बाणेगर शाळे जवळ हे एकत्र कुटुंब राहते. रेश्मा फिरोज शेख (३२) हिची जाऊ आसमा (२३) जानेवारी पासून एकत्र कुटुंबात पुन्हा सासऱ्याच्या घरी रहायला आली. तेव्हापासून आसमा बाथरूमला वगैरे काहीवेळ जाऊन परत आल्यावर तिची १५ महिन्यांची मुलगी रडताना तसेच नाकातून रक्त येत जखमा झालेल्या आढळून येत असे. 

रेश्मावर संशय असल्याने १४ सप्टेंबर रोजी तिने बेडरूममधील नवऱ्याच्या पॅन्टच्या खिशात मोबाईलचे शूटिंग सुरू केले व बाथरूमला गेली. काहीवेळातच मुलीचे रडणे ऐकून ती परत आली असता पलंगावर झोपलेली मुलगी खाली जमिनीवर पडलेली होती. 

तिने मोबाईलमधील शूटिंग पाहिली असता त्यात रेश्मा ही मुलीला हाताने बेदम मारत असल्याचे तसेच दाराजवळ लाथेने मारत असल्याचे दिसून आले. आसमाच्या तक्रारीवरून नया नगर पोलिसांनी रेश्माविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रेश्माच्या ह्या क्रूर विकृती चा परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. 

 

Web Title: Crime against aunt who beat up 15-month-old kid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app