शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
3
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
4
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
5
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
6
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
7
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
8
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
9
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
10
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
11
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
12
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
13
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
14
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
15
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
16
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
17
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
18
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
19
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
20
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा

घोड्याच्या बेटिंगनंतर क्रिकेट बेटिंगचा पदार्फाश; पैशांवरुन खंडणी मागणाऱ्या लाईन बॉयसह दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 14:58 IST

Cricket Betting : याप्रकरणी उमेश अशोक मुलचंदानी (वय २३, रा. विमाननगर) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

ठळक मुद्दे अजय शिंदे (रा. खडक पोलीस वसाहत, कल्याणीनगर) आणि गौरव आहुला (वय २०, रा. टिळक रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पुणे : ऑनलाईन क्रिकेट बेटिंगमध्ये पैसे हरल्यानंतर पळून गेलेल्या मित्राचे पैसे एका हॉटेल व्यावसायिकाला मागणार्या लाईन बॉयसह दोघांनागुन्हे शाखेच्या युनिट ४ ने अटक केली आहे.अजय शिंदे (रा. खडक पोलीस वसाहत, कल्याणीनगर) आणि गौरव आहुला (वय २०, रा. टिळक रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सचिन पोटे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अजय शिंदे याचे वडिल पोलीस कर्मचारी होते. अजय शिंदे याच्यावर यापूर्वी मारामारीचे गुन्हे असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला घरातून हकलून दिले होते. सचिन पोटे हाही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.याप्रकरणी उमेश अशोक मुलचंदानी (वय २३, रा. विमाननगर) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश मुलचंदानी याच्या दुकान आहे. गौरव आहुजा याच्या वडिलांचे विमाननगर येथे हॉटेल आहे. पण त्याला वडिलांच्या हॉटेलमध्ये बसायचे नव्हते. त्यासाठी त्याने ऑनलाईन बेटिंगचा व्यवसाय सुरु केला. गौरव व उमेश हे ओळखीचे आहेत. गौरवने मी बेटिंगचा व्यवसाय सुरु केला असून कोणाला खेळायचे असेल तर सांग असे म्हणाला होता. उमेश याच्या ओळखीचा रजत ग्रोवर याने बेटिंगविषयी विचारल्यावर त्याने गौरवकडे त्याला पाठविले होते. गौरवकडे ऑनलाईन बेटिंग खेळात गौरवर हा अडीच लाख रुपये हरला. तो गौरव याला पैसे न देताच गावी पळून गेला. त्यामुळे तु त्याला पाठविले होते, त्याने पैसे दिले नाहीत, आता ते पैसे तु दे, अशी मागणी गौरव हा उमेशकडे करु लागला. जर मी खेळलो नाही तर तुला कशाचे पैसे देणार असे उमेश म्हणाला. त्यानंतर अजय शिंदे याचा उमेश याला फोन आला. त्याने तु मला ओळखत नाही का मी अयजय शिंदे खडक पोलीस लाईन. बाहेर कोणालाही विचार अजय शिंदे कोण आहे. आणि त्यानंतर बोल माझ्याशी. तुला मी सांगतो तेवढे ऐक मॅचचे पैस आहेत, तुला मी परतसांगतो. तुझ्याकडे मी येणे इतका तू मोठा नाहीस, येडे चाळे करु नकोस. मी कल्याणीनगर येथे थांबलो आहे. तू येथे ये अशी धमकी अजय शिंदे याने देऊन अडीच लाखांची खंडणी मागितली. याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने तातडीने हालचाल करुन गौरव आहुला आणि अजय शिंदे याला अटक केली.याबाबत पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांनी सांगितले की, या ऑनलाईन बेटिंगमध्ये अनेक बड्यांनी आर्थिक गुंतवणुक केली आहे. आहुजा हा एकत्यातील लिंक आहे. गौरव आहुजा आणि फिर्यादी यांच्या संभाषणात अजय शिंदे हाही या बेटिंगमध्ये आहुजाचा पार्टनर असल्याचा उल्लेख आहे. त्यादृष्टीने आम्ही तपास करीत आहोत.

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीPoliceपोलिसPuneपुणेonlineऑनलाइनArrestअटक