गायीला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 15:24 IST2021-05-21T15:23:28+5:302021-05-21T15:24:15+5:30
A cow was hit by a two-wheeler : एका गायीला दुचाकीची (क्रमांक एमएच ३४ एजी ७२५९) धडक बसली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

गायीला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू
चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील महाराष्ट्र तेलंगणा राष्ट्रीय महामार्गावर राजुराकडून येत असताना एका गायीला दुचाकीची (क्रमांक एमएच ३४ एजी ७२५९) धडक बसली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
प्रकाश कोंडुजी वाडगुरे (३३) असे मृतकाचे नाव असून तो सोमनाथपूर येथील रहिवासी होता. या धडकेत त्याच्या डोक्यावर जबरदस्त मार लागल्यामुळे उपचारासाठी दाखल करण्याअगोदरच त्याचा मृत्यू झाला. प्रकाश हा साईकृपा ट्रान्सपोर्ट येथे काम करीत असल्याची नागरिकांकडून माहिती मिळाली. गुरुवारी तो त्याची सासुरवाडी सोनूर्ली येथे जाण्यासाठी निघाला होता. मात्र वरूर रोडजवळ हा अपघात घडला. याबाबतची माहिती पोलिसांना कळताच राजुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला.
पी-३०५ बार्जच्या कॅप्टनवर यल्लो गेट पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखलhttps://t.co/OpuONDYfbG
— Lokmat (@MiLOKMAT) May 21, 2021