शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्याच्या भावाला कोर्टाने दिला दणका; अटकपूर्व जामीन फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 19:10 IST

प्रकाश नाईक मृत्यू प्रकरण

ठळक मुद्देसत्र न्यायालयानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानेही जामीन नाकारला आहे. अटकेची शक्यता लक्षात घेऊन विल्सनने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता.

पणजी - मेरशीचे माजी सरपंच प्रकाश नाईक यांच्या मृत्यु प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यावर अटकपूर्व जामीन मागण्यासाठी गेलेल्या मॉविन गुदिन्हो यांचे बंधू विल्सन गुदिन्हो यांना सत्र न्यायालयानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठानेही जामीन नाकारला आहे. त्याची आव्हान याचिका खंडपीठाने गुरूवारी फेटाळून लावली. न्या. नूतन सरदेसाई यांच्यापुढे या प्रकरणात सुनावणी सुरू होती. या प्रकरणातील सुनावणी पूर्ण झाली होती व निवाडा राखून ठेवला होता. गुरूवारी या प्रकरणात न्या. सरदेसाई यांनी निवाडा जाहीर करताना गुदीन्होची आव्हान याचिका फेटाळली. त्यामुळे विल्सनपुढे आता दोनच पर्याय राहिला आहे. एक तर अटक चुकविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणे किंवा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या क्राईम ब्रँचला शरण जाणे.

प्रकाश नाईक यांचा संशयितरित्या मृत्यू झाला होता. त्याच्या खोलीतच त्याच्या डोक्याला गोळी झाडण्यात आली होती. त्याच्या मोबाईलमधून त्याच्या बहिणीला पाठविण्यात आलेल्या मेसेजमध्ये ते आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. तसेच विल्सन गुदिन्हो आणि ताहीर अशा दोन नावांचा उल्लेख करीत त्यांनी त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आणल्याचे म्हटले होते. त्यामुळे या प्रकरणात कुटुंबियांनी जुने गोवा पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली होती. जुने गोवा पलिसांनी हे प्रकरण आत्महत्या म्हणून नोंद केले होते, विल्सन गुदिन्हो व ताहीर विरणानी यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी गुन्हे नोंदविण्यात आले होते. नंतर हे प्रकरण क्राईम ब्रँचला देण्यात आले.

अटकेची शक्यता लक्षात घेऊन विल्सनने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर विल्सनने खंडपीठात सत्र न्यायालयाच्या निवाड्याला आव्हान दिले होते. प्रकाश नाईक यांची बहीण अक्षया नाईक यांनी त्याला जामीन देण्यासाठी हरकत घेताना हस्तक्षेप याचिका सादर केली होती. ती खंडपीठाने दाखल करून घेतली. या प्रकरणाच्या तपासासाठी विल्सनचा कोठडीतील तपास आवश्यक असल्याचे पोलीसांनी खंडपीठाला सांगितले होते.

टॅग्स :Courtन्यायालयMurderखूनministerमंत्रीgoaगोवाHigh Courtउच्च न्यायालय