नोकरी नसल्याच्या नैराश्येतून पत्नीचा खून करुन तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 17:28 IST2021-05-18T15:43:02+5:302021-05-18T17:28:28+5:30
Crime News : पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. त्यामुळे अधिक माहिती अजून उपलब्ध झालेली नाही.

नोकरी नसल्याच्या नैराश्येतून पत्नीचा खून करुन तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी : पत्नीचा खून करुन तरुणाने स्वतःलाही संपवल्याची घटना रत्नागिरीच्या कुवारबाव येथे घडली आहे. रोहित राजेंद्र चव्हाण (२९) आणि पूजा रोहित चव्हाण (२८) अशी त्यांची नावे आहेत. नोकरी नसल्याच्या नैराश्येतून हा प्रकार घडला असल्याचा अंदाज आहे.
रत्नागिरीनजीकच्या कुवारबाव येथे रोहित आणि पूजा हे दांपत्य राहत होते. त्यांना एक छोटी मुलगीही आहे. मंगळवारी दुपारी रोहित आणि पूजाचा मृतदेह आढळला. पूजाचा मृतदेह बिछान्यावर होता तर रोहितचा मृतदेह ओढणीच्या सहाय्याने पंख्याला लटकत होता.
रोहितने पूजाचा खून करुन स्वतःचेही आयुष्य संपवून घेतले आसावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अधिक तपासातून लवकरच पूर्ण माहिती उघड होईल.रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे निरीक्षक अनिल गंभीर अधिक तपास करत आहेत.
बल्लारपुरात दुचाकीचोरांना ठोकल्या बेड्या, चार वाहने जप्तhttps://t.co/WypSvNiPP1
— Lokmat (@MiLOKMAT) May 18, 2021