दिवसभर होळी खेळली, रात्री आंघोळीसाठी बाथरुममध्ये एकत्र गेले कपल, परत बाहेर आलेच नाहीत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 11:25 IST2023-03-09T10:51:00+5:302023-03-09T11:25:48+5:30
एका दाम्पत्याने दिवसभर होळी खेळली, दिवसभर जल्लोष केला. रात्री दोघं एकत्रच बाथरुममध्ये आंघोळीसाठी गेले. एक तास झाला, दोन तास झाले.

दिवसभर होळी खेळली, रात्री आंघोळीसाठी बाथरुममध्ये एकत्र गेले कपल, परत बाहेर आलेच नाहीत...
एका दाम्पत्याने दिवसभर होळी खेळली, दिवसभर जल्लोष केला. रात्री दोघं एकत्रच बाथरुममध्ये आंघोळीसाठी गेले. एक तास झाला, दोन तास झाले. तरीही ते बाहेर आलेच नाहीत. नातेवाईकांनी बाहेरुन आवाज दिला. तरीही आतून काहीही प्रतिक्रिया आली नाही, मुलांना संशय आला. दरवाजा उघडून आत गेले तर दाम्पत्य बेशुद्ध अवस्थेत सापडले. रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेश येथील गाझियाबादमधील आहे.
मंगळवारी देशभरात होळी मोठ्या उत्साहात साजरी झाली. उत्तर प्रदेशमध्येही मोठ्या उत्साहात होळी साजरी झाली. दरम्यान, गाझियाबाद मधून मोठी घटना समोर आली आहे. बाथरुममध्ये आंघोळ करत असताना दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे गाझियाबादमध्ये खळबळ उडाली आहे. या मृत्यूचे कारण काय अशी चर्चा आहे. आता या मृत्यूचे कारण समोर आले आहे. दाम्पत्यांनी यादरम्यान गॅस गिझरही चालू केला होता. सुमारे तासाभरानंतर ते दोघेही बेशुद्धावस्थेत पडून असल्याचे त्यांच्या मुलांना दिसले. यानंतर दाम्पत्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.
अपमानाचा बदला घेण्यासाठी रिक्षाचालकाला संपवलं; CCTV मुळं खूनाचं रहस्य उघड झालं
मिळालेली माहिती अशी, होळी खेळल्यानंतर हे दाम्पत्य घराच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेले होते. गिझर चालू केल्यानंतर दाम्पत्याने गिझरमधून गॅस गळतीकडे लक्ष दिले नाही. यानंतर ते दाम्पत्य बेशुद्ध पडले. सुमारे १ तास दोघेही बाथरूममधून बाहेर न आल्याने त्यांच्या मुलांनी बाथरूमचा दरवाजा उघडला असता दोघेही बेशुद्धावस्थेत आढळले.
या दाम्पत्याला रुग्णालयात मृत घोषित केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. याप्रकरणी पोलीस अद्याप अधिक तपास करत आहेत.