Coronavirus : कोरोनाच्या भीतीने तरुणाने आत्महत्या केली; तिसरी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 14:15 IST2020-03-25T14:01:21+5:302020-03-25T14:15:54+5:30
Coronavirus : पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे.

Coronavirus : कोरोनाच्या भीतीने तरुणाने आत्महत्या केली; तिसरी घटना
कानपूर - ताप आणि खोकल्याचा त्रास असलेल्या एका तरूणाने मंगळवारी गळफास लावून आत्महत्या केली. देशात हाहाकार माजवलेल्या कोरोनाच्या भीतीने त्याने ही आत्महत्या केली. कोरोना विषाणूची लागण होण्याची भीती असल्याने त्याने आत्महत्या केली. उत्तर प्रदेशात कोरोना घाबरल्याने आत्महत्या केल्याची ही तिसरी घटना आहे.
दोन वेगळ्या घटनांमध्ये, दोन तरुणांनी आठवड्याच्या शेवटी हापूर आणि बरेली येथे आत्महत्या केली. कारण त्यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाल्याची भीती मनात होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूरच्या सचेंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बिनौर गावात मंगळवारी एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. गेल्या एका आठवड्यापासून त्याला ताप आणि खोकल्याचा त्रास होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे.