Coronavirus : सहार पोलीस ठाण्याला कोरोनाचा विळखा, आढळले ३२ कोरोना रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 06:23 PM2020-05-13T18:23:39+5:302020-05-13T18:27:10+5:30

Coronavirus : सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चाचणी करण्याची मागणी

Coronavirus : Sahar police station found 32 corona patients pda | Coronavirus : सहार पोलीस ठाण्याला कोरोनाचा विळखा, आढळले ३२ कोरोना रुग्ण

Coronavirus : सहार पोलीस ठाण्याला कोरोनाचा विळखा, आढळले ३२ कोरोना रुग्ण

googlenewsNext
ठळक मुद्देविषेशतः जर अशी व्यक्ति बाहेर फिरत असल्यास त्यांच्यामुळे प्रादूर्भाव वाढू शकतो.पोलीस ठाण्यातील सर्वांची चाचणी करण्यात यावी अशी मागणी विलेपार्ले मतदारसंघाचे भाजपा आमदार ऍड.पराग अळवणी यांनी आज एका पत्राद्वारे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकड़े सदर मागणी केली.

मुंबई  : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच सहार तथा मरोळ सारख्या अत्यंत दाटीवाटिच्या वस्त्या ज्या पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येतात त्या सहार पोलीस ठाण्यातील ३२ जण आतापर्यंत कोरोनाग्रस्त असल्याचे आढळले आहे. त्यामुळे सदर पोलीस ठाण्यातील सर्वांची चाचणी करण्यात यावी अशी मागणी विलेपार्ले मतदारसंघाचे भाजपा आमदार ऍड.पराग अळवणी यांनी आज एका पत्राद्वारे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकड़े सदर मागणी केली. तसेच त्याची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकड़े सदर पत्राची प्रत पाठवण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.

एकाच पोलीस ठाण्यात ३२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागण होणे अतिशय गंभीर परिस्थिती असून आपल्या योद्धाची काळजी घेणे तसेच मोठ्या प्रमाणात विषाणूची लागण का होत आहे ? याबाबत विचार करावा लागेल. तसेच पुढील काळातील या लढाईत पुरेसा स्टाफ उपलब्ध असावा या बाबतही नियोजन करावे लागेल असे अळवणी यांनी पत्रात नमूद केले आहे.

सदर पोलीस ठाण्याच्या हद्दित विमानतळ येत असून सद्या प्रदेशातून येत असलेले प्रवासी तसेच कार्गोमुळे तेथे मोठ्या प्रमाणात लोकांचा वावर आहे. तसेच सदर पोलीस ठाण्याच्या हद्दित असलेला सहार व मरोळ पाईपलाइन सारख्या भागात सुमारे ८० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यामुळे सुद्धा तेथील कर्तव्य बजावणारे पोलिसकर्मी हाय रिस्कमध्ये येतात अशी माहिती त्यांनी दिली.

 महापालिकेच्या प्रचलित धोरणानुसार मात्र सकारात्मक हाय रिस्कमध्ये असलेल्या व्यक्तिची चाचणी करण्यात येत नाही. यामुळे असे संभाव्य पॉझिटिव्ह रुग्ण मात्र चाचणी शिवाय ट्रेस होत नाहीत. यामुळे अशा व्यक्ति मात्र सायलेंट कॅरिअर असल्याने इतरांना विष्णुने संक्रमित करु शकतो. विषेशतः जर अशी व्यक्ति बाहेर फिरत असल्यास त्यांच्या मुळे प्रादूर्भाव वाढू शकतो.


त्याच सोबत हे पण ध्यानात ठेवणे गरजेचे आहे की वर्षभरापूर्वी कर्तव्याच्या वेळा कमी करण्यात आल्या असल्यातरी वर्षानुवर्षे विचित्र वेळापत्रकामुळे व कर्तव्य बजावत असताना असलेल्या मानसिक ताणामुळे पोलिसांमधली रोगप्रतिकारशक्ति कमी असू शकते. एखाद्या विषम परंतू सकारात्मक कोरोना रुग्णामुळे अशा एखाद्या असुरक्षित व्यक्तिस लागण झाल्यास गंभीर परिस्थिति निर्माण होउ शकते ऐसे पत्रात नमूद करत त्यांनी त्वरित उपाययोजनेची आवश्यकता शेवटी विशद केली.

हृदयद्रावक! बेवारस पडला होता मृतदेह, चिमुकल्याचा फोटो पाहून डोळ्यात तरळतील अश्रू 

 

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात युवक काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार

 

Video : लॉकडाउनमध्ये पोलिसाची ड्युटी सोडून 'सिंघम' गिरी, धाडली कारणे दाखवा नोटीस

Web Title: Coronavirus : Sahar police station found 32 corona patients pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.