शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

Coronavirus : पोलीस बनला देवदूत! १० तास प्रवास करून कॅन्सरग्रस्तास दिली औषधं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 9:52 PM

Coronavirus : लॉकडाऊनमुळे काही लोकांना अन्न आणि औषधे मिळविण्यास समस्या येत आहेत.

ठळक मुद्देकर्नाटकातील कॅन्सरच्या रुग्णाचे औषध संपले होते. त्यांना औषधाची नितांत आवश्यकता होती.प्रत्येकजण या कोरोना योद्धाचे कौतुक करीत आहे. कर्नाटकचा धारवाड येथे राहणारा उमेश हा कॅन्सर रुग्ण आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे लॉकडाउनचा दुसरा टप्पा देशभरात सुरू आहे. लॉकडाऊनमुळे काही लोकांना अन्न आणि औषधे मिळविण्यास समस्या येत आहेत. अशा लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी कोरोना योद्धा सुद्धा गुंतले आहेत. हे योद्धे कठीण काळात लोकांसाठी देवदूत म्हणून बाहेर पडत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना कर्नाटकात घडली आहे.

कॅन्सर रुग्णाला औषधांची नितांत गरज होती. कर्नाटकातील कॅन्सरच्या रुग्णाचे औषध संपले होते. त्यांना औषधाची नितांत आवश्यकता होती. अशा परिस्थितीत कर्नाटक पोलिसांचा एक सैनिक त्या व्यक्तीला ९६० किमी स्कुटी चालवून औषध आणून दिली. प्रत्येकजण या कोरोना योद्धाचे कौतुक करीत आहे. कर्नाटकचा धारवाड येथे राहणारा उमेश हा कॅन्सर रुग्ण आहे. 

कॅन्सर रुग्णाला औषधाची नितांत आवश्यकता होती. औषधे फक्त बंगळुरूमध्येच सापडली. १० एप्रिल रोजी बंगळुरू पोलिसांचे 47 वर्षीय हेड कॉन्स्टेबल एस कुमारस्वामी यांनी स्थानिक वृत्तवाहिनीवर उमेश यांच्याबाबत बातमी ऐकली. रविवारीपर्यंत हे औषध घ्यायचे होते, असे उमेश सांगत होता. पण लॉकडाऊनमुळे ते बंगळूरहून औषध घेऊ शकले नाहीत.धारवाड येथे जाण्यासाठी एसीपीकडून परवानगीहेड कॉन्सटेबल कुमारस्वामी यांनी रुग्णाला औषध पोचवण्याचा विचार केला आणि त्यांची ड्युटी संपल्यानंतर दुसर्‍याच दिवशी न्यूज चॅनेलच्या कार्यालयात पोचला. तेथून त्याने उमेशचा नंबर घेतला. त्यानंतर त्यांनी बंगळुरूमधील डीएस रिसर्च सेंटरमधून औषधे घेतली आणि एसीपी अजय कुमार सिंग यांच्याकडे धारवाडला जाण्यासाठी परवानगी मागितली.10 तास प्रवासआयसीपीने त्यांना धारवाड येथे जाण्याची परवानगी दिली. शनिवारी पहाटे ते चार वाजता धारवाडहून निघाले आणि अडीच वाजता तेथे पोहोचले. त्यांनी फक्त पाणी आणि बिस्किटांच्या मदतीने १० तास प्रवास केला. कुमारस्वामी उमेशच्या घरी पोहोचला तेव्हा तो त्याला पाहून थक्क झाला.फायर स्टेशनमध्ये रात्र घालवलीउमेशच्या घरी काही काळ राहिल्यानंतर कुमारस्वामी बंगळुरूला रवाना झाले. सलग १० तास स्कूटी चालविण्यास कंटाळलेला कुमारस्वामी रात्री १०.३० वाजता चित्रदुर्गाच्या अग्निशमन केंद्रात पोहोचला आणि तेथेच रात्री आराम केला. दुसर्‍या दिवशी सकाळी ५. ३० वाजता ते पुन्हा बंगळुरूला निघाले आणि सकाळी १०.३० वाजता पोहोचले.मी फक्त आत्म्याचा आवाज ऐकलाकुमार स्वामी यांनी सांगितले की, त्यांचा धारवाडशी काही संबंध नाही, ते रामनगरातील रहिवासी आहे. ते पुढे म्हणाले, मी फक्त आत्म्याचा आवाज ऐकला आणि निघून गेलो. कुमारस्वामी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कुमारस्वामी यांचा बंगळूरच्या सिटी कमिश्नर भास्कर राव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टॅग्स :PoliceपोलिसKarnatakकर्नाटकcorona virusकोरोना वायरस बातम्याcancerकर्करोगmedicinesऔषधं