CoronaVirus News rape attempt with covid positive female patient ward boy of private hospital arrested | CoronaVirus News : खळबळजनक! रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर असणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर बलात्काराचा प्रयत्न 

CoronaVirus News : खळबळजनक! रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर असणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर बलात्काराचा प्रयत्न 

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक भयंकर घटना समोर आली आहे. रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर असणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये हा संतापजनक प्रकार घडला असून घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वॉर्ड बॉयला अटक करण्यात आली आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेरच्या एका खासगी रुग्णालयात एका महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते. 

कोरोनाग्रस्त महिलेची ऑक्सिजन लेव्हल कमी असल्याने तिला काही वेळ ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. याच दरम्यान रुग्णालयातील वॉर्ड बॉयने महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या मुलाने केलेल्या तक्रारीत शनिवारी रात्री एक वॉर्ड बॉय त्याच्या आईच्या वॉर्डमध्ये आला. महिला कोरोना संक्रमित असल्याने त्या ठिकाणी दुसरं कोणीही उपस्थित नव्हतं. याचाच गैरफायदा घेत त्या वॉर्ड बॉयने आईसोबत चुकीचे वर्तन सुरू केले. यानंतर आईने आरडोओरडा करायला सुरुवात केली. 

महिलेने आरडोओरडा केला असता वॉर्ड बॉय तेथून फरार झाला. त्यानंतर कोरोनाग्रस्त महिलेने आपल्या मुलाला कॉल करून हा सर्व धक्कादायक प्रकार सांगितला. तसेच याबाबत कळताच मुलाने आपल्या नातेवाईकांसह रुग्णालय गाठलं. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी वॉर्ड बॉयला अटक केली आहे. तसेच त्याची अधिक चौकशी करण्यात येत आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला असून त्याबाबत देखील तपास करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयंकर! ऑक्सिजन अभावी तडफडत होते रुग्ण पण डॉक्टर वाचवू शकले नाहीत त्यांचा जीव; 12 जणांच्या मृत्यूने खळबळ

मध्य प्रदेशच्या शहडोलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अनेक रुग्णालयांना ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. ऑक्सिजनची कमतरता दूर झाल्याचा दावा शिवराज सिंह चौहान सरकार करत आहे. पण या घटनेने सरकारचा दावा फोल ठरला आहे. शहडोलच्या जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन अभावी कोरोनाच्या 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात ऑक्सिजन अभावी रुग्ण तडफडत होते पण प्रयत्न करूनही डॉक्टर त्यांचा जीव वाचवू शकले नाहीत. 12 जणांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. गेल्या 24 तासांत ऑक्सिजन अभावी 12 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑक्सिजन सिलिंडर संपल्याने मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. ऑक्सिजनचा तुटवडा नव्हता तर ऑक्सिजनचे प्रेशर कमी झाले होतं असं म्हटलं आहे.

विकृतीचा कळस! 5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार; गळा दाबून केली निर्घृण हत्या

उत्तर प्रदेशच्या बदायूमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. भयंकर बाब म्हणजे यानंतर चिमुकलीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. एक चिमुकली आपल्या आईसोबत शेतात गेली होती. यावेळी 30 वर्षीय आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. तसेच गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली आहे. यानंतर काही स्थानिक लोकांनी आरोपीला घटनास्थळीच पकडलं आणि बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपी युवकाला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका गावातील 5 वर्षांची निष्पाप मुलगी आपल्या आईसोबत शेतात गेली होती. शेतात गेल्यानंतर ती आपल्या आईपासून काही अंतरावर गहू निवडत होती. यावेळी पीडित मुलीला एकटी पाहून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. 

English summary :
CoronaVirus News rape attempt with covid positive female patient ward boy of private hospital arrested

Web Title: CoronaVirus News rape attempt with covid positive female patient ward boy of private hospital arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.