badaun badaun news five year old raped and murdered accused beaten up by villagers | विकृतीचा कळस! 5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार; गळा दाबून केली निर्घृण हत्या

विकृतीचा कळस! 5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार; गळा दाबून केली निर्घृण हत्या

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटनेत वाढ झाली आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा एक भयंकर घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या बदायूमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. भयंकर बाब म्हणजे यानंतर चिमुकलीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

एक चिमुकली आपल्या आईसोबत शेतात गेली होती. यावेळी 30 वर्षीय आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. तसेच गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली आहे. यानंतर काही स्थानिक लोकांनी आरोपीला घटनास्थळीच पकडलं आणि बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपी युवकाला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका गावातील 5 वर्षांची निष्पाप मुलगी आपल्या आईसोबत शेतात गेली होती. शेतात गेल्यानंतर ती आपल्या आईपासून काही अंतरावर गहू निवडत होती. यावेळी पीडित मुलीला एकटी पाहून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. 

मिळालेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांनी 30 वर्षीय आरोपी युवकाला रंगेहाथ पकडलं आणि बेदम चोप दिला. दरम्यान गावातील एकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी युवकाला ताब्यात घेतलं. एसएसपी संकल्प शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, '5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी आरोपीला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

उत्तर प्रदेश हादरलं! अयोध्येत 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, परिसरात खळबळ

उत्तर प्रदेश एका भयंकर घटनेने पुन्हा एकदा हादरलं आहे. अयोध्येत 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशच्या अयोध्या जिल्ह्यातील रुदौली परिसरातील एका गावात चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गावातील तरुणानेच हे कृत्य केलं आहे. मुलीची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: badaun badaun news five year old raped and murdered accused beaten up by villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.