राज्यभरात २७ हजार ४३२ गुन्हे दाखल, लॉकडाऊनदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 10:24 PM2020-04-08T22:24:21+5:302020-04-08T22:39:28+5:30

Coronavirus Lockdown : १२ हजार ४२० वाहने जप्त, पुण्यात सर्वाधिक उल्लंघन

Coronavirus Lockdown: 27 thousand 432 crimes cases were filed across the state during lockdown pda | राज्यभरात २७ हजार ४३२ गुन्हे दाखल, लॉकडाऊनदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

राज्यभरात २७ हजार ४३२ गुन्हे दाखल, लॉकडाऊनदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

Next
ठळक मुद्देतब्बल १२ हजार ४२० वाहने जप्त करत ९५ लाख ५६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. व्हीसा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या परदेशी व्यक्तींविरोधात १५ गुन्हे नोंदवण्यात आले.

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध २७ हजार ४३२ गुन्हे पोलिसांच्या दफ्तरी नोंद झाले आहेत. यात, तब्बल १२ हजार ४२० वाहने जप्त करत ९५ लाख ५६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. 

       
यात पुण्यात सर्वाधिक म्हणजे ३ हजार २५५ गुन्हे दाखल आहेत. त्यापाठोपाठ सोलापूर, अहमदनगरचा क्रमांक लागतो. याच काळात राज्यभरात ४३८ व्यक्तींनी ‘होम क्वारंटाइन’चे आदेश पायमल्ली तुडवले आहे. तसेच व्हीसा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या परदेशी व्यक्तींविरोधात १५ गुन्हे नोंदवण्यात आले. सध्या सगळीकड़े जमावबंदी आणि संचारबंदी आदेश जारी करण्यात आले. या काळात विनाकारण बाहेर पडणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणताना पोलिसांच्या नाकीनउ आले. अशात काहीनी या पोलिसांनाच टार्गेट केले. अशाप्रकारे राज्यभरात पोलिसांवर हल्ला चढ़विल्याप्रकरणी तब्बल ६० गुन्हे दाखल असून १६१ जणांना बेडया ठोकण्यत आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी याचाही विचार करणे गरजेचे आहे.
             
अशाप्रकारे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यभरात बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंत राज्यात एकूण २७ हजार ४३२ गुन्हे नोंदवून १८८६ जणांना अटक करण्यात आली आहे. यात पुणे शहर(३२५५), सोलापूर शहर(२५९४), अहमदनगर(२४४९)नागपूर शहर(१९९९), पिंपरी चिंचवड(१९३३) येथे सर्वाधिक गुह्यांची नोंद आहे. तर मुंबईत १६७९ गुन्हे दाखल आहेत. 
        
पोलीस नियंत्रणात कक्षात ५८ हजार तक्रारी
या काळात राज्य पोलिसांच्या नियंत्रण कक्षात कोरोनाबाबत  तब्बल ५८ हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात सोमवारी दिवासभरात तब्बल ६ हजार १३ तक्रारीचा यात समावेश आहे. नागपुरमधून सर्वाधिक म्हणजे १७ हजार ६६८, मुंबई १४ हजार ६९८ कॉल्स आले आहेत. तर याबाबत  बुलढाणा आणि अमरावतीतून एकही कॉल आलेला नाही.

Web Title: Coronavirus Lockdown: 27 thousand 432 crimes cases were filed across the state during lockdown pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.