शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

coronavirus: महापालिकेच्या दुय्यम अभियंत्याची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 2:28 AM

दिलेल्या तक्रारीनुसार, ७ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास कार्यालयात असताना, पेटीएम केवायसी समाप्त होत असल्याने ग्राहक सेवा क्रमांकाशी संपर्क साधण्याचा संदेश प्राप्त झाला होता.

मुंबई: पेटीएम केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली महापालिकेच्या दुय्यम अभियंत्याची फसवणूक केल्याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.वरळी परिसरात राहण्यास असलेले ४० वर्षीय तक्रारदार अभियंता सी विभागात कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ७ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास कार्यालयात असताना, पेटीएम केवायसी समाप्त होत असल्याने ग्राहक सेवा क्रमांकाशी संपर्क साधण्याचा संदेश प्राप्त झाला. त्यानुसार त्यांनी बुधवारी संबंधित क्रमांकावर कॉल करून चौकशी केली. त्यांना नव्याने पेटीएम डाऊनलोड करून, क्विक सपोर्ट नावाची लिंक उघडण्यास सांगून त्यात १० रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. याच दरम्यान त्यांच्या खात्यातून ५ हजार रुपये काढल्याचा संदेश मोबाइलवर धडकला. यात, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई