मरकजमध्ये सहभागी झालेल्या १५६ परदेशींवर व्हिसा उल्लंघनबाबत गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 10:43 PM2020-04-12T22:43:17+5:302020-04-12T22:45:48+5:30

पुढील तपास सुरू आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे

coronavirus: FIR registered on 156 foreigners for visa violation, they involved in merkaj BKP | मरकजमध्ये सहभागी झालेल्या १५६ परदेशींवर व्हिसा उल्लंघनबाबत गुन्हे दाखल

मरकजमध्ये सहभागी झालेल्या १५६ परदेशींवर व्हिसा उल्लंघनबाबत गुन्हे दाखल

Next

मुंबई दि.१२- कोरोना प्रतिबंध करण्यासाठी राज्यात सर्वत्र लाँकडाऊन सुरू आहे. या काळात पोलिस विभागाने व्हिसा उल्लंघन केल्याप्रकरणी 156 परदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. हे परदेशी नागरिक व्हिसा नियमांचे उल्लंघन करून दिल्लीच्या मरकज़मध्ये सामिल झाले होते.

 या १५६ विदेशी नागरिकांच्या विरोधात  फॉरेन ऍक्ट कलम 14 बी आणि भा.दं.वि.कलम १८८, २६९, २७० नुसार गुन्हा नोंदविला आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अमरावती, नांदेड, नागपुर, पुणे, अहमदनगर, चंद्रपुर आणि गडचिरोलीमध्ये हे एकूण १५ गुन्हे नोंदविले आहेत .

 हे सर्व विदेशी नागरिक पर्यटन व्हिसा घेऊन भारतात आले आहेत. ते व्हिसाच्या नियमांचं उल्लंघन करून निज़ामुद्दीन, दिल्ली च्या मरकज़ मध्ये सामिल झाले होते. या परदेशी नागरिकांमध्ये कज़ाखस्तान -९, दक्षिण 
अफ़्रीका -१, बांगलादेश-१३, ब्रूनेइ-४, आयवोरियन्स -९, इराण-१, टोगो-६, म्यानमार-१८, मलेशिया-८, इंडोनेशिया-३७, बेनिन-१, फ़िलीपििंस-१०, अमेरिका-१, टंझानिया-, रशिया-२, जिबोती-५, घाना-१, किर्गिस्तान-१९ या देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. या सर्वांना इंटरनॅशनल क्वारेंटिनमध्ये ठेवण्यात आले आहे.

Web Title: coronavirus: FIR registered on 156 foreigners for visa violation, they involved in merkaj BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.