शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : मध्य प्रदेशातून पलायन केलेल्या 8 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 19:41 IST

CoronaVirus : कुसुमकोट बु. येथून आठ नागरिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

ठळक मुद्देमंगळवारी रात्री तणावाचे वातावरण : बुऱ्हाणपूर येथून परतले मुस्लिम बांधवांना पोलिसांनी मारहाण केल्याची चर्चा कानावर पडताच शहरातील मुस्लिम बांधवांनी वसतिगृहाकडे धाव घेतली.

धारणी (अमरावती) : तालुक्यातील कुसुमकोट बु. गावात मध्य प्रदेशातील खंडवा, बऱ्हाणपूर येथून पळून आलेले विशिष्ट समाजाचे आठ नागरिक त्यांच्या नातेवाइकाकडे थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मंगळवारी साडेनऊ वाजताच्या सुमारास कुसुमकोट बु. गावात जाऊन त्यांना ताब्यात घेतले. यावेळी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, तगड्या पोलीस बंदोबस्तामुळे तणाव निवळला. रात्री १ वाजता धारणी येथील मुलींच्या वसतिगृहात त्यांना ठेवण्यात आले. 

प्राप्त माहितीनुसार, कुसुमकोट बु. गावात मध्य प्रदेशातून आलेले नातेवाईक स्थानिक विशिष्ट समाजातील रहिवाशांकडे आल्याची माहिती धारणी पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीनुसार धारणी पोलिसांनी मंगळवारी गावात चौकशी केली. आमच्याकडे कोणीच आलेले नसल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी शोधमोहीम राबवून या आठ जणांना ताब्यात घेतले आणि त्यांची माहिती लपविणाऱ्या दोन कुटुंबप्रमुखांनाही जेरबंद केले. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तथापि, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय काळे, पोलीस निरीक्षक एल.के. मोहुंदळे, सहायक निरीक्षक अतुल तांबे, उपनिरीक्षक माया वैश्य, कर्मचारी अनिल झरेकर, अनुराग पाल, आकाशे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी तगडा बंदोबस्त ठेवला.

सामान मशिदीमागे लपवूनमध्य प्रदेशातून आलेल्या या नागरिकांचे साहित्य गावातील मशिदमागे लपवून ठेवण्यात आले होते. ते नागरिकांनी हुडकून पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर पोलिसांनी रात्री १ च्या सुमारास धारणी येथील मुलींच्या निवासी वसतिगृहात आणून ठेवले होते. 

दोन दिवसांपासून तळ ठोकून खंडवा, बऱ्हाणपूर येथून पळून कुसुमकोट येथे दोन दिवसांपासून तळ ठोकणारे सर्व जण वाठोडा शुक्लेश्वर (ता. भातकुली) येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांना आश्रय देणाऱ्यांनी पोलिसांची दिशाभूल केली. अमरावती येथील मुस्लिम बांधवाचा इज्तेमानंतर त्यांना रीतिरिवाजानुसार बाहेरगावच्या मशिदीत पाठविण्यात आले होते. आम्ही सर्वच मशिदीचे नमाजी आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.  आरोग्य तपासणी करून घेण्याचा सल्लासदर मुस्लिम बांधवांना पोलिसांनी मारहाण केल्याची चर्चा कानावर पडताच शहरातील मुस्लिम बांधवांनी वसतिगृहाकडे धाव घेतली. तेथे पोलीस त्यांची चौकशी करत होते. स्थिती लक्षात येताच जामा मशिदीचे अध्यक्ष हाजी फहीम व सलीम खान यांनी त्यांना सत्य लपवू नका व आरोग्य तपासणी करून घ्या, असे सांगितले. शासन निश्चित कालावधीनंतर घरी सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

मध्य प्रदेशातून कुसुमकोट बु. गावात नागरिक पायी आले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी गावात तनाव निर्माण झाला होता. यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना होम क्वारंटाइन केले आहे. ज्यांनी आसरा दिला, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. - संजय काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, धारणी

टॅग्स :PoliceपोलिसAmravatiअमरावतीMosqueमशिदMadhya Pradeshमध्य प्रदेश