Coronavirus : राज्यात कोविड संदर्भात 2 लाख 80 हजार गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 21:32 IST2020-10-12T21:32:02+5:302020-10-12T21:32:42+5:30
Coronavirus : 1347 वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले असून एकूण 30 कोटी 77 लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आला आहे, अशी माहिती गृह विभागाकडून देण्यात आली.

Coronavirus : राज्यात कोविड संदर्भात 2 लाख 80 हजार गुन्हे
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात 2 लाख 80 हजार गुन्हे दाखल केले आहेत. तसेच 1347 वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले असून एकूण 30 कोटी 77 लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आला आहे, अशी माहिती गृह विभागाकडून देण्यात आली.
22 मार्च ते 10 आँक्टोंबर पर्यंत कलम 188 नुसार 2,80,307 गुन्हे नोंद झाले असून 40,808 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 96 हजार 568 वाहने जप्त केली.यातील विविध गुन्ह्यांसाठी 30 कोटी 77 लाख 74 हजार 982 रुपये दंड आकारण्यात आला.
या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 372 घटना घडल्या. त्यात 898 व्यक्तींना, ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1347 वाहनांवर गुन्हे दाखल केली आहेत.