coronavirus: 11 accused gang-raped woman, eight accused found corona positive | coronavirus: महिलेवर ११ जणांनी केला सामुहिक बलात्कार, आठ आरोपी निघाले कोरोना पॉझिटिव्ह

coronavirus: महिलेवर ११ जणांनी केला सामुहिक बलात्कार, आठ आरोपी निघाले कोरोना पॉझिटिव्ह

रांची - झारखंडमधील पाकूड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. (Crime News)इथे एका ३५ वर्षीय महिलेवर ११ जणांनी सामुहिक बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित महिला दोन दिवस बेशुद्धावस्थेत होती. त्यानंतर या महिलेने कुटुंबीयांसह मुफस्सिल पोलीस ठाण्यात धाव घेत घडल्या प्रकाराची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत सर्व ११ आरोपींना अटक केली. अटकेनंतर या आरोपींची कोरोना तपासणी केली असता त्यामध्ये ११ आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. (11 accused gang-raped woman, eight accused found corona positive)

झारखंडमधील पाकुडा येथे हा प्रकार घडला आहे. एसपी मणिलाल मंडल यांनी या प्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी सांगितले की, पीडित महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपींमध्ये महिलेच्या नातेवाईकांचाही समावेश आहे. सदर महिला संध्याकाळी शौचास जात असताना त्याच वाटेवर काही तरुण मद्यप्राशन करत होते. सदर महिलेला एकटे पाहून यातील काही आरोपींनी तिचे अपहरण केले. 

त्यानंतर या महिलेला दूरवर झाडीमध्ये नेऊन सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी आपल्या अजून काही नातेवाईकांनाही बोलावले. त्यानंतर संपूर्ण रात्रभर या महिलेवर बलात्कार केला. सकाळी हे सर्व आरोपी या महिलेला तशाच निपचित अवस्थेत सोडून पसार झाले. तिथून ही महिला सकाळी कशीबशी घरी आली. 

या घटनेनंतर कुटुंबीयांनी महिलेवर उपचार केले. प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यावर या महिलेने मुफस्सिल पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तिथे त्यांनी आपबीती सुनावली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी सांगितले की,सदर तरुणांना ही महिला संध्याकाळच्या वेळी शौचास जाते हे माहिती होते. त्यामुळेच ते इथे दबा धरून बसले होते, त्यानंतर त्यांनी तिचे अपहरण करत सामुहिक बलात्कार केला. याबाबत महिलेने तक्रार दिल्यानंतर १० तासांच्या आत आरोपींना अटक करण्यात आली. सुरुवातीला १० आरोपींना अटक करण्यात आली. एक अल्पवयीन आरोपी फरार झाला होता. मात्र त्यानंतर त्यालाही ताब्यात घेण्यात आले. 

English summary :
11 accused gang-raped woman, eight accused found corona positive

Web Title: coronavirus: 11 accused gang-raped woman, eight accused found corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.