वादग्रस्त ट्विट लिहिणाऱ्या काँग्रेस नेत्याला अटक; धार्मिक भावना भडकवण्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 14:15 IST2020-05-21T14:12:45+5:302020-05-21T14:15:35+5:30
"पंकज पूनिया यांनी धर्माच्या आधारावर समाजातील समूहांमध्ये वैर वाढविण्याकरिता भडकाऊ आणि चुकीचे वक्तव्य केले आहे आणि ही कृत्ये सद्भावना टिकवण्यासाठी हानिकारक आहेत," असा फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे. पुनिया यांनी मंगळवारी एका ट्विटमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य करत प्रवासी मजुरांना ने - आण करण्यासाठी काँग्रेसने सुरु केलेल्या बसवरून राजकारण केले असल्याने म्हटले होते. हे ट्विट आता काढून टाकण्यात आले आहे.

वादग्रस्त ट्विट लिहिणाऱ्या काँग्रेस नेत्याला अटक; धार्मिक भावना भडकवण्याचा आरोप
चंदीगड - हरियाणा येथील काँग्रेस नेता पंकज पूनिया यांना आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी करनालमधील पोलिसांनीअटक केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सचिव पूनिया यांना मधुबन पोलीस ठाण्यात करनाल येथील रहिवाशाच्या लेखी तक्रारीनंतर बुधवारी रात्री उशिरा अटक केली.
लेखी तक्रारीत पूनिया यांनी आपल्या ट्विटद्वारे "धार्मिक भावना दुखावल्या आहेत" आणि "धर्माच्या आधारे विविध गटांमधील वैर वाढविले" असा आरोप केला आहे. मधुबन पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक तरसेम चंद म्हणाले, "पंकज पूनिया यांना मधुबन भागातून अटक करण्यात आली." उत्तर प्रदेश पोलिसांनीही बुधवारी पूनियाविरोधात अशीच तक्रार दाखल केली होती. पूनियाविरोधात कथित आक्षेपार्ह ट्विटबद्दल लखनऊच्या हजरतगंजमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला.
पूनियाविरोधात मधुबन पोलीस ठाण्यात विविध समूहांमध्ये धार्मिक भावना भडकविणे या संबंधित भारतीय दंड संहितेचे कलम आणि माहिती व तंत्रज्ञान (दुरुस्ती) अधिनियम २००८ च्या कलम 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "पंकज पूनिया यांनी धर्माच्या आधारावर समाजातील समूहांमध्ये वैर वाढविण्याकरिता भडकाऊ आणि चुकीचे वक्तव्य केले आहे आणि ही कृत्ये सद्भावना टिकवण्यासाठी हानिकारक आहेत," असा फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे. पुनिया यांनी मंगळवारी एका ट्विटमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य करत प्रवासी मजुरांना ने - आण करण्यासाठी काँग्रेसने सुरु केलेल्या बसवरून राजकारण केले असल्याने म्हटले होते. हे ट्विट आता काढून टाकण्यात आले आहे.
शिवसेना नेत्याची भररस्त्यात गोळी झाडून हत्या; संतप्त कार्यकर्त्यांकडून रुग्णालयाची तोडफोड
तक्रारदार तरुणीचा विनयभंग; पोलीस उपनिरीक्षकाला अटक
खाकीला काळिमा! तक्रार दाखल करण्यास आलेल्या युवतीचा पोलीस अधिकाऱ्याने केला विनयभंग
Coronavirus : मुंबई पोलीस दलाला आणखी एक धक्का, दोन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू