शेजारणीवर जीव जडला; पत्नीसह जन्मदात्यांचा 8 लाखांची सुपारी देऊन काढला काटा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 07:33 PM2020-05-20T19:33:41+5:302020-05-20T19:49:24+5:30

पोलिसांनी आतिष आणि अनुज यांना अटक केली आहे. तर हा हत्या करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. पाच पोलीस पथके त्यांचा शोध घेत आहेत.

लॉकडाऊनमध्ये गुरुवारी एकाच कुटुंबातील चार सदस्यांची गळा दाबून हत्या हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २८ वर्षीय आतिष केसरवानी आणि त्याचा साथीदार मुलगा अनुज याला अटक केली आहे.

गेल्या गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता आतिष घरी परतला असता वडील तुलसीदास केसरवानी (६४), आई किरण (६०), बहीण निहारिका (३०) आणि पत्नी प्रियंका (२७) यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पाहिले. एकाच कुटुंबातील चार जणांना ठार मारल्यानंतर परिसरात खळबळ उडाली

इतर दोन आरोपी फरार आहेत. या हत्येबाबत सांगताना पोलिसांनी माहिती दिली की, शेजारणीसोबतच्या अनैतिक संबंधाला विरोध केल्यामुळे आतिषने कुटुंबातील आई, वडील, बहीण आणि पत्नी यांची हत्या करण्यात आली आहे. आतिषला शेजारणीशी दुसरं लग्न करायचं होतं. 

माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळावरील चौकशीत आतिशने सांगितलं की, तो बँकेत गेला होता. दुपारी घरी परत आला तेव्हा सर्वजणांचा मृतदेह पाहून धक्का बसला आहे.

आतिष आणि त्याचा मित्र अनुपने दोन आठवड्यांपूर्वी या सामूहिक हत्येचा कट रचला. आतिशने ८ लाखांची सुपारी मित्र अनुप, त्याचे काका बच्चा श्रीवास्तव आणि अजून एकाला दिली. ८ लाखांपैकी ७५ हजार रुपये आतिशने दिले होते. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांना चाकूने गळा आवळून खून करण्यात आला.

काही दिवसांपूर्वी घरात शेजारणीशी असलेल्या अनैतिक संबंधाबाबत घरात वादविवाद झाला होता. यानंतर आतिषने त्याचा मित्र अनुज श्रीवास्तव यांच्यासह हत्येचा कट रचला.

अनुजमार्फतच भाडोत्री माणसांना बोलवण्यासाठी ८ लाखांची सुपारी देण्यात आली. या हत्येमध्ये एकूण चार जणांचा सहभाग असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी आतिष आणि अनुज यांना अटक केली आहे. तर हा हत्या करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. पाच पोलीस पथके त्यांचा शोध घेत आहेत.