शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

फडणवीस, चित्रा वाघ यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार; पूजाचे कुटुंब, बंजारा समाजाच्या बदनामीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 5:14 AM

तक्रारीत राठोड यांनी नमूद केले की, पूजा चव्हाण या बंजारा समाजाच्या मुलीने आत्महत्या केली, ही बाब खेदाची असून त्याचे आम्हालाही दु:ख आहे. यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे, असे म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (जि. वाशीम) : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी तपास सुरू असतानाच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजप नेत्या चित्रा वाघ, अतुल भातखळकर, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, प्रसाद लाड यांच्याविरुद्ध बंजारा समाजाची बदनामी केल्याची तक्रार मानोरा पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. 

राष्ट्रीय बंजारा परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष श्याम सरदार राठोड (रा. गुंडी) यांनी सोमवारी ही तक्रार देत या सर्व नेत्यांविरुध्द कारवाईची मागणी केली. पोलिसांनी याबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविले आहे, असे मानोरा पोलिसांनी सांगितले.

तक्रारीत राठोड यांनी नमूद केले की, पूजा चव्हाण या बंजारा समाजाच्या मुलीने आत्महत्या केली, ही बाब खेदाची असून त्याचे आम्हालाही दु:ख आहे. यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्यासह हे भाजप नेते बंजारा समाजाची, पूजा चव्हाणच्या कुटुंबाची बदनामी करून चारित्र्यहनन करीत आहेत. तसेच, पोलीस तपासात अडथळा निर्माण केला जात आहे. त्यामुळे संबंधित नेते व मीडियावर कारवाई करावी; अन्यथा राष्ट्रीय बंजारा परिषदेतर्फे आंदोलन करू, असा इशाराही तक्रारीत देण्यात आला आहे. सदर तक्रार प्राप्त झाली आहे. मानोरा पोलिसांनी ती तपासात ठेवली असून, वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविले आहे. मानोराचे ठाणेदार शिशिर मानकर यांनी सांगितले.

प्रकरण दाबण्यासाठी दिलेत ५ कोटी रुपयेपुणे : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार नाही, तोवर लढा सुरू ठेवला जाणार आहे. सर्वसामान्य व्यक्तीवर लगेच गुन्हा दाखल केला जातो; मात्र, मंत्र्यांवर गुन्हा दाखल होत नाही, हे दुर्दैव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे, अशी माहिती पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी दिली आहे. 

n प्रकरण दाबण्यासाठी  पूजाच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये दिले, असा दावा त्यांनी केला. शांताबाई राठोड यांनी सोमवारी (दि. १) पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राठोड म्हणाल्या, पूजाचे आणि माझे चांगले नाते होते. तिला न्याय मिळणार नाही, तोवर लढा सुरू राहील. पाच कोटी रुपये दिल्याचा पुरावा योग्यवेळी नावासह देणार आहे. n परळीतील सीसीटीव्ही मिळावे यासाठी अर्ज दिला आहे. अरुण राठोड हा माझ्या चुलतभावाचा मुलगा आहे. पूजाचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणSanjay Rathodसंजय राठोड