शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

अर्णब गोस्वामीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार, अटक करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 20:43 IST

एका तक्रारीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फॅन्स क्लब तर्फे आज मंगळवारी पोलिसांकडे करण्यात आली.

ठळक मुद्दे प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेतली आहे.

नागपूर : पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध अपमानजनक भाषेचा वापर करून सरकार पाडण्याची धमकी दिल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे फॅन्स क्लब तर्फे निषेध नोंदविण्यात आला. पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करून त्यांच्या चॅनलविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी एका तक्रारीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फॅन्स क्लब तर्फे आज मंगळवारी पोलिसांकडे करण्यात आली.

प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेतली आहे. उद्धव ठाकरे फॅन्स क्लबचे रवनिश पांडे यांनी कळमना पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, रिपब्लिकन भारत या चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपमानजनक भाषेचा वापर केला. पत्रकार गोस्वामी यांनी या माध्यमातून सरकार पाडण्याची धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

गोस्वामी यांचे हे वक्तव्य आणि कृती निषेधार्ह असून ते समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण गढूळ होत असून सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी पत्रकार अर्णाब गोस्वामी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करा. त्यांच्या चैनलवरही बंदी घालावी, अशी मागणी रवनीश पांडे यांनी तक्रारीतून केली आहे. फॅन्स क्लबचे सदस्य तसेच शिवसेनेचे पदाधिकारी मंगळवारी दुपारी कळमना पोलिस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी ही तक्रार नोंदविली. या तक्रारीसोबत पांडे यांनी व्हिडीओ क्लिपही पोलिसांना दिली. ठाणेदार चव्हाण यांनी ही तक्रार नोंदवून पुढील कारवाईसाठी वरिष्ठांकडे पाठवली आहे. तक्रारीची संवेदनशीलता लक्षात घेता वरिष्ठ अधिकारी तक्रारीवर निर्णय घेण्यासाठी विचारविमर्श करीत आहेत.

 

विशेष शाखेकडून दखल पत्रकार गोस्वामी यांच्याविरुद्ध यापूर्वीही नागपुरात एक तक्रार दाखल झाली होती. आजची ही दुसरी तक्रार असून तिचे गांभीर्य लक्षात घेत विशेष शाखेतर्फेही चौकशी सुरू करण्यात आली आहे.चौकशी सुरू : डीसीपी नीलोत्पलया तक्रारीची आणि व्हिडीओ क्लिपची आम्ही चौकशी करीत आहोत. मुंबईत असा काही गुन्हा दाखल झाला का, त्याचीही चौकशी केली जात आहे, असे या संबंधाने बोलताना परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी सांगितले.

अन्य महत्वाच्या बातम्या...

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश

 

गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी

 

नवव्या पतीनं केली हत्या, अनैतिक संबंधांतून गळ्यावरून फिरवला सुरा

 

थरारक! मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून केली हत्या 

 

"सुशांतचे वडील म्हणताहेत ते खरं नाही, कुठलीही लेखी तक्रार केलेली नाही!"- मुंबई पोलीस

 

आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या

 

मटका किंग जिग्नेश ठक्कर हत्येप्रकरणी गुजरातचा शूटर जाळ्यात

 

मुसळधार पावसामुळे सुशांत सिंग प्रकरणी हायकोर्टातील याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली 

 

सुशांत प्रकरणात वेगळं वळण, ईडीकडून रियाच्या सीएची चौकशी

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliceपोलिसnagpurनागपूर