सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 10:21 IST2025-08-17T10:21:09+5:302025-08-17T10:21:47+5:30

Crime News : नल्ली राजू आणि मौनिका यांचे ८ वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्यांना दोन मुलेही आहेत. मात्र...

Companion turned enemy! Gave 5 sleeping pills, smothered husband's face with a pillow; threw him on the road as soon as he knew he was dead! | सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!

सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!

आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील पथपट्टनम येथील एससी वसाहतीच्या बाहेरच्या बाजूला, एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ त्याची मोटरसायकलही पडलेली होती. पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पथपट्टनम येथील मोंडी गोला स्ट्रीटचा रहिवासी नल्ली राजू अशी केली. त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा नसल्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला संशयास्पद मृत्यूची नोंद केली.

मात्र, शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली. राजूने झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या आणि गुदमरून त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. राजूच्या मृत्यूच्या आदल्या रात्री मोंडी गोला स्ट्रीटवरील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. या फुटेजमध्ये दोन संशयित व्यक्ती मोंडी गोला स्ट्रीटमध्ये फिरताना दिसले. त्यांची ओळख गुंडू उदय कुमार आणि मल्लिकार्जुन अशी पटली.

पत्नीच्या चौकशीतून उघडले सत्य
या दोघांना पकडण्यात आले, पण खरी कहाणी तेव्हा उघडकीस आली, जेव्हा राजूच्या पत्नीची चौकशी करण्यात आली. तेव्हा असे कळले की, राजूची पत्नी मौनिका हिनेच त्याची हत्या केली होती. पथपट्टनमच्या मोंडी स्ट्रीटचा रहिवासी नल्ली राजू आणि मौनिका यांचे ८ वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्यांना दोन मुलेही आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून मौनिकाचे पथपट्टनमच्या गुंडू उदय कुमारसोबत प्रेमसंबंध होते.

याबद्दल नल्ली राजूला कळल्यावर त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी मौनिकाला अनेकदा समजावले, पण आपल्या प्रियकराच्या प्रेमात वेड्या झालेल्या मौनिकाने त्याच्यापासून लांब न जाता आपल्या पतीला मारण्याचा कट रचला. कारण तो तिच्या आणि तिच्या प्रियकराच्या मार्गात अडथळा ठरत होता. या महिन्याच्या ५ तारखेला मौनिकाने आपल्या पतीच्या जेवणात ५ झोपेच्या गोळ्या मिसळल्या.

उशीने घेतला जीव
त्यानंतर, मध्यरात्री मौनिकाने तिचा प्रियकर गुंडू उदय कुमारला बोलावले. तो आपला मित्र मल्लिकार्जुनसोबत नल्ली राजूच्या घरी पोहोचला. मग त्यांनी राजूच्या चेहऱ्यावर उशी ठेवून त्याचा गळा दाबला आणि त्याची हत्या केली. नंतर, उदयकुमार आणि मल्लिकार्जुन यांनी आधी राजूची बाईक घेतली आणि एससी स्ट्रीटच्या शेवटी उभी केली. त्यानंतर त्यांनी राजूचा मृतदेह ते ज्या बाईकवर आले होते, त्यावर लादला.

राजूचा मृतदेह त्यांनी आधी एससी कॉलनीत पार्क केलेल्या बाईकजवळ फेकून दिला. त्यांना वाटले की, लोक असा विचार करतील की, राजू बाईकवरून पडला आणि त्याचा अपघाती मृत्यू झाला. योजनेनुसार, दुसऱ्या दिवशी सकाळी मौनिकाने आपल्या नातेवाईकांना फोन केला आणि सांगितले की, रात्री बाहेर गेलेले तिचे पती घरी परत आले नाहीत. नंतर, जेव्हा स्थानिक लोकांनी राजूचा मृतदेह पाहिला, तेव्हा त्यांनी याची माहिती मौनिकाला दिली.

तिघांना अटक
राजूचा मृतदेह पाहताच मौनिका रडू लागली आणि काहीच माहीत नसल्याचे नाटक करू लागली. मात्र, पोलिसांच्या तपासामुळे अखेर खुन्यांचे रहस्य उघड झाले. या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी नल्ली राजूची पत्नी मौनिका, तिचा प्रियकर गुंडू उदय कुमार आणि त्याचा मित्र मल्लिकार्जुन यांना अटक केली. तिघांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले, जिथून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले.

Web Title: Companion turned enemy! Gave 5 sleeping pills, smothered husband's face with a pillow; threw him on the road as soon as he knew he was dead!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.