कपडे बदलताना सहकारी तरुणीचे चित्रिकरण; विकृत नोकराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 09:28 PM2020-01-05T21:28:35+5:302020-01-05T21:30:27+5:30

तरुणीने तात्काळ घर मालकिणीच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.

Colleague shoot video on mobile while girl changing clothes; The servant arrested | कपडे बदलताना सहकारी तरुणीचे चित्रिकरण; विकृत नोकराला अटक

कपडे बदलताना सहकारी तरुणीचे चित्रिकरण; विकृत नोकराला अटक

Next
ठळक मुद्दे प्रदीप रॉय असं या विकृताचे नाव असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.तिला स्वच्छतागृहात काही तरी चमकत असल्याचे आढळले. त्यावेळी प्रदीपचे बिंग उघड झाले.

मुंबई - सहकारी तरुणी कपडे बदलत असताना चोरून मोबाईलद्वारे चित्रीकरण करणाऱ्या एका माथेफिरूला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या केली. प्रदीप रॉय असं या विकृताचे नाव असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीडित तरुणी (२३) ही पवई येथे एका महिलेकडे कामाला असून या महिलेच्याच घरात तिच्या मुलीचा सांभाळ करण्याची जबाबदारी पीडित तरुणीकडे होती. याच महिलेच्या घरात जेवण बनविण्याचे काम प्रदीप रॉय करतो. घरात पीडित तरुणीला राहण्यासाठी वेगळी खोली होती. मात्र, नोकर वर्गासाठी स्वच्छतागृह एकच होते. या स्वच्छतागृहात पीडित तरुणी कपडे बदलत असताना तिला स्वच्छतागृहात काही तरी चमकत असल्याचे आढळले. त्यावेळी प्रदीपचे बिंग उघड झाले. तिने जवळ जाऊन पाहिले असता, तो मोबाईल असल्याचे आढळले. यावेळी तरुणीने तात्काळ घर मालकिणीच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पवई पोलिसांनी प्रदीप रॉय याला अटक केली असून पुढील तपास करत आहे.

Web Title: Colleague shoot video on mobile while girl changing clothes; The servant arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.