मेट्रो सबवेत सुरक्षारक्षकांमध्ये हाणामारी; सीसीटीव्हीची केली तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 22:21 IST2018-08-01T22:19:17+5:302018-08-01T22:21:29+5:30
इगल सिक्युरिटीविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

मेट्रो सबवेत सुरक्षारक्षकांमध्ये हाणामारी; सीसीटीव्हीची केली तोडफोड
मुंबई - नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेलेच सुरक्षारक्षक एकमेकांवर जीवघेणा हल्ला करत असल्याचे सीसीटीव्हीच्या माध्यमातून उघड झाले आहे. अतिशय सामसूम असलेला मेट्रो सबवेमध्ये सुरक्षरक्षकांचा पहारा ठेवण्यात येतो. याच मेट्रो येथील सबवे सुरक्षारक्षकांमध्ये १५ दिवसांपूर्वी हाणामारी झाली होती. त्यानंतर त्यांनी तिथले सीसीटीव्ही तोडले होते. याप्रकरणी इगल सिक्युरिटीविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.