Police आणि NCP कार्यकर्ते यांच्यात झटापट; कार्यकर्त्यांचा अनिल देशमुख यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 02:28 PM2021-10-11T14:28:21+5:302021-10-11T15:19:36+5:30

CBI and Anil Deshmukh : देशमुख यांचा मुलगा आणि सुनेला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून अटक होण्याची शक्यता आहे. 

Clashes between police and NCP activists; Activists try to break into Anil Deshmukh's house | Police आणि NCP कार्यकर्ते यांच्यात झटापट; कार्यकर्त्यांचा अनिल देशमुख यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न

Police आणि NCP कार्यकर्ते यांच्यात झटापट; कार्यकर्त्यांचा अनिल देशमुख यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देसीबीआय, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरुद्ध नारेबाजी करत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अनिल देशमुख यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते.

नागपूर - नागपुरातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयने आज केलेली कारवाई ही तिसऱ्यांदा केलेली कारवाई आहे. मनी लाँड्रिंग (money laundering) प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या निवासस्थानी आज सीबीआयने(CBI) छापेमारी केली, त्यावेळी सीबीआयचे ७ अधिकारी देशमुखांच्या घरी पोहचले. देशमुख यांचा मुलगा आणि सुनेला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून अटक होण्याची शक्यता आहे. मात्र, यादरम्यान देशमुख यांच्या निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. पोलीस राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहे. तत्पूर्वी सीबीआय, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरुद्ध नारेबाजी करत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अनिल देशमुख यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी पोलीस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यात झटापट सुद्धा झाली.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 8:00 वाजता नागपुरातील सीबीआय कार्यालयाची टीम सिव्हिल लाईन येथे असलेल्या अनिल देशमुख यांच्या घरी पोहोचली, अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या 1 महिन्यापासून घरी नाहीत. अनिल देशमुख यांचे निवासस्थानी सीबीआय टीमकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांना  शोधण्यासाठी पोहोचले आहेत.असे म्हटले जात आहे की लुकआउट नोटीसनंतर शोध (search operation) कार्यवाही ही कारवाईची एक पद्धत आहे, त्या अंतर्गत ही टीम पोहोचली आहे. आधी या कारवाईसाठी, सीबीआय आणि ईडीने कार्यालय आणि निवासस्थानी अनेक वेळा कारवाई केली आहे,

Web Title: Clashes between police and NCP activists; Activists try to break into Anil Deshmukh's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.