शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

भाईंदरच्या डोंगरी पोलीस चौकी जवळ चालणाऱ्या हुक्का पार्लरविरोधात नागरिकांमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 10:04 PM

भाईंदरच्या डोंगरी पोलीस चौकी जवळ असलेल्या हँग आऊट या हुक्का पार्लर मध्ये तरुण - तरुणींच्या वाढत्या राबत्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

 मीरारोड - भाईंदरच्या डोंगरी पोलीस चौकी जवळ असलेल्या हँग आऊट या हुक्का पार्लर मध्ये तरुण - तरुणींच्या वाढत्या राबत्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलीसां कडुन मात्र उच्च न्यायालयाने हरबल हुक्काची परवानगी दिल्याने कारवाई करता येत नसल्याचे म्हटले आहे. पोलीसां कडुन मात्र न्यायालयाच्या आदेशाचा सोयीने वापर करुन हुक्का पार्लरला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. हुक्का पार्लरचे बांधकामसुद्धा बेकायदेशीर असून, पालिकेचे अभय असल्याचे ग्रामस्थ म्हणाले.भाईंदरच्या उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या अखत्यारित असलेल्या डोंगरी चेक पोस्ट जवळ हँग आऊट या नावाने हुक्का पार्लर तसेच बार चालतोय. या ठिकाणी मध्यरात्री नंतर उशीरा पर्यंत हुक्का पार्लर चालवले जात आहे. उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक एस.डी.निकम यांनी दिलेल्या माहिती नुसार सदर हुक्का पार्लर चालकाने मुंबईतील अन्य हुक्का पार्लर चालकां सोबत मिळून उच्च न्यायालयात याचीका केली होती. त्यांनी हरबल हुक्का असल्याचा दावा करत न्यायालयाकडून परवानगी मिळवली आहे.हरबल हुक्का म्हणून परवानगी असल्याने तसेच वेळेची मर्यादा घालून दिलेली नसल्याने कारवाई करता येत नाही. तरी देखील पोलीस नियमीत जाऊन तपासणी करत असतात असे सांगतानाच निकम यांनी ४ सप्टेंबर रोजी सदर हुक्का पार्लवर कोप्ता कायद्याखाली सॅवियो मॉशीनो फनसेका (३६) , रविकुमार अशोककुमार दुबे (२५) व आशिष रामआचल शर्मा (१९) या तिघां विरोधात गुन्हा दाखल केल्याचे ते म्हणाले. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक देवीदास हंडोरे यांनी देखील हरबल हुक्का पार्लर असल्याने कारवाईचा प्रश्न असल्याचे सांगितले.परंतु स्थानिक ग्रामस्थांसह सत्यकाम फौऊंडेशनचे कृष्णा गुप्ता यांनी मात्र स्थानिक पोलीस आणि महापालिका यांच्या आशिर्वादानेच तरुण पिढीला उध्वस्त करणारा हा हुक्का पार्लर सुरु असल्याचा आरोप केला आहे. सदर हुक्का पार्लचे बांधकाम, शेड , भराव बेकायदेशीर असुन कांदळवनाच्या ५० मीटर आत तसेच सीआरझेड मध्ये असूनही सदर बेकायदा बांधकाम महापालिका तोडत नाही. पोलीस देखील बेकायदेशीर बांधकामा कडे काणाडोळा करतात. बेकायदा बांधकामास वीज पुरवठ्यापासून अन्य परवानग्या मिळाल्याच कशा ? असा सवाल त्यांनी केला आहे.न्यायालयाने देखील हरबल हुक्कासाठी परवानगी दिली असली तरी येथे हुक्कासाठी वापरले जाणारे पदार्थ हरबल असल्याचे प्रमाणपत्र कोणत्या शासकीय संस्थेने दिले आहे? हुक्का पार्लरसाठी वेळेचे बंधन काय आणि किती आहे ? महापालिकेने वा शासनाच्या संबंधित विभागाने परवाना दिला आहे का ? दिला असल्यास कोणत्या अटिशर्ति व निकषा खाली दिला आहे ? असे अनेक सवाल करत पोलीसां कडुन कारवाईला टाळटाळ केली जात असल्याचा आरोप केला आहे. हुक्का पार्लरवर ठोस कारवाई करुन ते बंद केले नाही तर वरिष्ठां कडे दाद मागण्यासह तरुण व ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMira Bhayanderमीरा-भाईंदर