chinese teacher sentenced to death for poisoning 25 children in revenge | भयंकर! शिक्षिकेने नर्सरीच्या 25 मुलांना दिलं विष; कारण ऐकून बसेल धक्का

भयंकर! शिक्षिकेने नर्सरीच्या 25 मुलांना दिलं विष; कारण ऐकून बसेल धक्का

पेइचिंग - चीनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शिक्षिकेने नर्सरीच्या 25 मुलांना विष दिल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात शिक्षिकेला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वांग यून असं शिक्षिकेचं नाव असून तिला हेनान प्रांतातील जिआओजू परिसरातून अटक केली होती. 

सकाळी नाश्ता खाल्ल्यानंतर मुलं आजारी पडली होती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील एका मुलाचा मृत्यू झाला. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिक्षिकेचा आपल्या सहकाऱ्यांशी काही कारणांवरून वाद झाला होता. याच गोष्टींचा बदला घेण्यासाठी शिक्षिकेने तो राग चिमुकल्यांवर काढला. मुलांच्या नाश्त्यामध्ये विषारी पदार्थ मिसळला.

नर्सरीच्या 25 मुलांना दिलं विष

संतापाच्या भरात वांग यून हिने मुलांच्या नाश्त्यामध्ये सोडियम नायट्रेट मिक्स केलं. गेल्या वर्षी 27 मार्च रोजी ही घटना घडली होती. जिआआजूच्या कोर्टाने यावर निकाल दिला असून शिक्षिकेला फाशीची शिक्षा सुनावली आहे. सोडियम नायट्रेटचा वापर हा अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी केला जातो. मात्र प्रमाणापेक्षा त्याचा जास्त वापर केल्यास ते शरीरीसाठी हानीकारक ठरतं.

शिक्षिकेला फाशीची शिक्षा 

मुलांना नाश्ता दिल्यानंतर मुलांना उलटीचा त्रास होऊ लागला आणि काही जण बेशुद्ध झाले. या घटनेचा अधिक तपास केला असता शिक्षिकेने 25 मुलांना विष दिल्याची माहिती समोर आली. मुलं आजारी पडली होती. त्यातील एका मुलाचा 10 महिन्यानंतर मृत्यू झाला. कोर्टाने निकाल दिला असून शिक्षिकेला फाशीची शिक्षा सुनावली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त् दिले आहे. 

Read in English

Web Title: chinese teacher sentenced to death for poisoning 25 children in revenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.