शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

Chhota Rajan : ज्याच्या मृत्यूची पसरली होती अफवा; तो छोटा राजन कोरोनातून झाला ठणठणीत बरा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 7:55 PM

Chhota Rajan : ७ मेला दुपारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात कोरोनाने मृत्यू झाल्याचे वृत्त आले व सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरू झाली होती.

ठळक मुद्दे१६ दिवसांनी छोटा राजनने कोरोनावर मात केली आहे. आज राजनला एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.   

कुविख्यात डॉन छोटा राजन उर्फ राजन निकाळजे याचा ७ मेला दुपारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात कोरोनाने मृत्यू झाल्याचे वृत्त आले व सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरू झाली होती. मात्र त्याचे निधन झाले नसून तो जिवंत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असा खुलासा एम्स रुग्णालयाने केला होता. गुन्हेगाराच्या उपचारांबाबत असा खुलासा रुग्णालयाला प्रथमच करावा लागला होता. त्यानंतर १६ दिवसांनी छोटा राजनने कोरोनावर मात केली आहे. आज राजनला एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.   

एकेकाळी आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिमचा अत्यंत विश्वासू साथीदार असलेला छोटा राजन १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेनंतर दाऊद टोळीतून फुटून बाहेर पडला होता. दुबईतून पलायन केल्यानंतर तो अनेक देशांत लपूनछपून वास्तव्यास होता. त्याही काळात तो मुंबईतील अंडरवर्ल्डमध्ये सक्रीय होता. आपल्या हस्तकांमार्फत त्याने मुंबईत अनेक गुन्हे केल्याचा आरोप आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील अनेक आरोपींची हत्या करून त्याने आपण देशभक्त डॉन असल्याचा दावा केला होता.

२५ आक्टोबर २०१५ रोजी इंडोनेशियात बाली येथे मोहन कुमार नावाने बनावट पासपोर्टच्या आधारे प्रवास करत असताना पकडला गेला. तो फरारी असल्याबाबत भारत सरकारने आधीच रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. संशय आल्यानंतर छोटा राजनच्या बोटांचे ठसे तपासले असता त्याची ओळख पटली. त्याच्या अटकेचे वृत्त समजल्यानंतर त्याला ताब्यात देण्याविषयी भारत सरकारकडून इंटरपोलशी संपर्क साधण्यात आला. छोटा राजनचे भारतात प्रत्यार्पण केल्यापासून तो दिल्लीच्या तिहारच्या कारागृहात आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे २५ एप्रिल रोजी त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. तर आज कोरोनातून मुक्त झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. 

टॅग्स :Chhota Rajanछोटा राजनcorona virusकोरोना वायरस बातम्याAIIMS hospitalएम्स रुग्णालयjailतुरुंग