शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

साखरपुड्याच्या दिवशी प्रियकरासोबत पळून गेली तरूणी, होणाऱ्या पतीने उचललं धक्कादायक पाउल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 11:57 IST

Chhattisgarh Crime News : कोरबा जिल्ह्यातील भालू सटका नक्तखार येथे राहणारा संजय यादव याचं लग्न एका तरूणीसोबत ठरलं होतं. साखरपुड्याचा कार्यक्रम ठरवण्यात आला.

छत्तीसगढच्या (Chhattisgarh Crime News) कोरबामधून लग्न करून नव्या आयुष्याचं स्वप्न बघत संजय यादव नावाचा तरूण साखरपुडा करण्यासाठी आपल्या सासरी निघाला होता. तेव्हाच बातमी आली की, त्याची होणारी पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. या घटनेने संजय इतका दु:खी झाला की, त्याने आत्महत्या करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आता त्याची तब्येत ठीक असल्याचं सांगितलं जात आहे. आता या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहे.

कोरबा जिल्ह्यातील भालू सटका नक्तखार येथे राहणारा संजय यादव याचं लग्न एका तरूणीसोबत ठरलं होतं. साखरपुड्याचा कार्यक्रम ठरवण्यात आला. ठरलेल्या तारखेनुसार १९ मार्चला साखरपुडा होणार होता. यानंतर २० मार्चला मंडप रिवाज सुरू करून २२ मार्चला लग्न होणार होतं. १९ मार्चला संजय साखरपुड्याला सासरी जाण्यासाठी तयार होत होता. तेव्हा समजलं की, त्याची होणारी पत्नी एका तरूणासोबत पळून गेली. संजयला याचा धक्का बसला. त्याला समजत नव्हतं की, आपल्या मित्रांना काय सांगणार?

लोक काय म्हणतील यांची चिंता त्याला सतावू लागली होती. त्याने लगेच असा विचार केला की, आता या जगात राहून फायदा नाही. अशात त्याने वडिलांच्या एक्स्पायर झालेल्या शुगरच्या १७ गोळ्या खाल्ल्या. घरातील लोकांना हे समजलं तर एकच गोंधळ उडाला. 

संजयला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तरूणी कटघोरा येथील राहणारी आहे. सध्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तर संजयवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तो आता बरा आहे. तरूणाच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तसेच तरूणाचा जबाबदही नोंदवण्यात आला आहे. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडCrime Newsगुन्हेगारी