शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

Chhota Rajan: पहिल्या गुन्ह्यातून छोटा राजन 38 वर्षांनी सुटला; मोठ्या प्रकरणात साक्षीदार सापडेनात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 12:52 PM

Chhota Rajan news: छोटा राजन तेव्हा दारु तस्करी करत होता. छोटा राजनचे वकील तुषार खंडारे यांनी सांगितले की, हे प्रकरण 1983 मध्ये नोंद झाले होते.

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची सीबीआय न्यायालयाने एका खटल्यात निर्दोष मुक्तता केली आहे. मुंबई अंडरवर्ल्डमध्ये डॉन दाऊद इब्राहिम कासकरचा सर्वात मोठा दुश्मन म्हटल्या जाणाऱ्या छोटा राजनच्या गुन्हेगारी आयुष्यातील हा पहिला एफआयआर होता. 1983 मध्ये त्याने पोलिस अधिकाऱ्यावर जिवघेणा हल्ला केला होता. छोटा राजनच्या विरोधातील हा पहिला मोठा गुन्हा होता. 

छोटा राजन तेव्हा दारु तस्करी करत होता. छोटा राजनचे वकील तुषार खंडारे यांनी सांगितले की, हे प्रकरण 1983 मध्ये नोंद झाले होते. एका टॅक्सीतून छोटा राजन आणि त्याचे साथीदार दारुची तस्करी करत होते. तेव्हा टिळक नगर पोलिस स्टेशनच्या एका गस्तीवरील पथकाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या पथकामध्ये दोन पोलिस अधिकारी आणि चार कॉन्स्टेबल होते. तर राजनच्या कारमध्ये दोन अन्य साथीदार होते. 

पोलिसांनी राजनची टॅक्सी थांबविली. तेव्हा राजनने चाकू काढून पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केला. मात्र, पोलिसांनी त्याला आणि त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले. तर दुसरा साथीदार पळून गेला. राजनसोबत अटक झालेल्या साथीदाराला न्यायालयाने सोडले होते तर राजनविरोधात गुन्हा सुरु होता. तो जामिनावर बाहेर आला होता. राजनला 2015 मध्ये इंडोनेशिया येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या काळात मुंबई पोलिसांनी हा खटला सीबीआयच्या ताब्यात दिला. सीबीआयने फायनल क्लोजर रिपोर्ट लावत म्हटले होते की केस खूप जुनी आहे. तसेच याबाबत कोणताही साक्षीदार आणि पुरावा सापडत नाहीए. हल्ल्यात वापरलेला चाकूदेखील गायब झाला आहे. यावर न्यायालयाने हा रिपोर्ट फेटाळला होता. परंतू आता राजनची या खटल्यातून मुक्तता करण्यात आली आहे.  

टॅग्स :Chhota Rajanछोटा राजनCBIगुन्हा अन्वेषण विभाग