शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

पुण्यात कास्टिंग काऊच; दिग्दर्शकाने अश्लिल व्हिडिओ बनवून अभिनेत्रीवर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 09:52 IST

याप्रकरणी कात्रज कोंढवा रोडवर राहणाया एका २१ वर्षाच्या तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे : फिल्म इंडस्ट्रीत बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करणार्‍या एका तरुणीला मित्राच्या फ्लॅटवर पार्टी करण्यासाठी घेऊन जाऊन तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर अश्लिल व्हिडिओ बवून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने वारंवार या तरुणीशी जबरदस्तीने शारीरीक संबंध केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अमित प्रेमचंद सिटलानी (वय ४०, रा. मधुबन सोसायटी, कळस) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कात्रज कोंढवा रोडवर राहणाया एका २१ वर्षाच्या तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मे २०१७ पासून २६ मार्च २०२२ पर्यंत सुरु होता. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये बॅक स्टेज ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून  करते. अमित सिटलानी हा कास्टिंग दिग्दर्शक म्हणून काम करतो. एका मित्राच्या ओळखीतून त्यांची ओळख झाली होती. अमित सिटलानी याने फिर्यादी यांना मे २०१७ मध्ये टिंगरेनगर येथील मित्राच्या फ्लॅटवर पार्टी करण्यासाठी नेले. तेथे त्याने फिर्यादीला बदनामी करण्याची धमकी देऊन त्याच्यावर बलात्कार केला. त्याने याचा अश्लिल व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर २०१८ पासून त्याने हा अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादी यांना तो वेगवेगळ्या हॉटेलवर बोलावायचा. इस्ट फिल हॉटेल, विमाननगर व स्काय व्हिस्टा हॉटेल, खराडी येथे घेऊन जाऊन फिर्यादी यांच्याशी त्याने जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. यावेळी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. 

अमित सिटलानी याने तिचा अश्लिल व्हिडिओ बनवून तिला वारंवार धमकी दिली. माझे इतके हजार फॉलोअर्स आहे, तुझी सर्व इंडस्ट्रीत बदनामी होईल अशी धमकी तो दिला देत होता. या सर्व प्रकारामुळे घाबरुन तिने आजवर कोणाला हा प्रकार सांगितला नव्हता. २६ मार्च रोजी त्याने तिच्यावर पुन्हा एकदा अत्याचार केला. शिवीगाळ करुन तिला मारहाण केली. सततच्या या अत्याचारामुळे तिने शेवटी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. सध्या ही तरुणी मानसिक धक्क्यामध्ये आहे. त्यामुळे तिच्याकडे पोलिसांना अधिक चौकशी करता आली नाही.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPuneपुणेPoliceपोलिस