Casino operator killed in Khaparkheda, accused jailed on CCTV | खापरखेड्यात कॅसिनो चालकाची हत्या, आरोपी सीसीटीव्हीत कैद

खापरखेड्यात कॅसिनो चालकाची हत्या, आरोपी सीसीटीव्हीत कैद

ठळक मुद्देआरोपींच्या शोधासाठी खापरखेडा पोलीस आणि गुन्हे शाखेची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत.

खापरखेडा : खापरखेडा शहरातील मुख्य बाजारपेठेत बुधवारी रात्री कॅसिनो चालकाची हत्या करण्यात आली. प्रशांत घोडेस्वार (३०) रा. वॉर्ड क्रमांक ४, खापरखेडा असे मृताचे नाव आहे. रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास झालेल्या या थरारक हत्याकांडामुळे खापरखेडा शहरातील कायदा व सुवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लागले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत घोडेस्वार याचे जागेच्या वादावरून घटनेच्या अर्ध्या तासापूर्वी एका व्यक्तीसोबत भांडण झाले. यानंतर रात्री ९.४५ वाजच्या सुमारास मुख्य मार्ग बाजारपेठ परिसरातील मोहन किराणा स्टोअरसमोर चार जणांनी त्याला गाठले. यातील एका बुरखाधारी आरोपीने त्याच्यावर चाकूने वार केले. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी तिथून पसार झाले. हा थरार पाहून बाजारपेठेतील घाबरलेल्या दुकानदारांनी तातडीने शटर बंद केले.

घटनास्थळाच्या बाजूलाच राजबाबा रेस्टॉरेंट आणि बार आहे. या बारच्या बाहेरील सीसीटीव्हीत हा थरार कैद झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तिघांची ओळख पटविली आहे. मात्र मुख्य आरोपी कोण, याचा अद्याप शोध लागलेला नाही. आरोपींच्या शोधासाठी खापरखेडा पोलीस आणि गुन्हे शाखेची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत.

Web Title: Casino operator killed in Khaparkheda, accused jailed on CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.