फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 11:51 IST2025-10-04T11:50:21+5:302025-10-04T11:51:29+5:30
या घटनेवर पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवत अभिनेत्री डिंपल हयाती आणि डेविड यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेनुसार कलम ७४, ७९, ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
हैदराबाद - अभिनेत्री डिंपल हयाती आणि तिचा पती डेविडविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका फ्लॅटमध्ये या दोघांनी २२ वर्षीय मोलकरणीचा छळ केल्याचा आरोप आहे. मूळची ओडिशा येथील तक्रारदार मुलगी २२ सप्टेंबरला श्री साई गुडविल सर्व्हिसच्या माध्यमातून नोकरीच्या शोधात हैदराबादला आली होती. त्याच दिवशी तिला वेस्टवूड अपार्टमेंटमध्ये डिंपलच्या फ्लॅटमध्ये नोकरी मिळाली.
या घटनेबाबत आम्ही पीडित मुलीचा जबाब नोंदवला आहे. चौकशीसाठी आरोपींना नोटीस पाठवली आहे असं पोलीस अधिकारी एस संतोषम यांनी सांगितले. तक्रारदार मुलीने आरोप केलाय की, डिंपल हयाती आणि डेविड सातत्याने मला त्रास देत होते. मला अपमानित करायचे. पुरेसे जेवणही मला दिले जात नव्हते. वारंवार मला शिवीगाळ आणि अपमानजनक शब्द वापरायचे. तुझा जीव माझ्या बुटांच्याही लायकीचा नाही असं डेविड म्हणायचा असा आरोप या मुलीने केला आहे.
२९ सप्टेबरला सकाळी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाजावरून खूप मोठा वाद झाला. तेव्हा डिंपल आणि डेविड यांनी बरीच शिवीगाळ केली, त्यानंतर माझ्या आई वडिलांना मारण्याचीही धमकी दिली. जेव्हा मी हे मोबाईलमध्ये रेकॉर्ड करू लागले तेव्हा त्यांनी माझा फोन हिसकावून घेतला. मला जमिनीवर आपटले, माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझे कपडे फाडले परंतु कशीतरी मी तिथून जीव वाचवत बाहेर पडले. त्यानंतर आमच्या एजेंटच्या मदतीने मी पोलीस ठाण्यात तक्रार केली असं पीडित मुलीने सांगितले.
दरम्यान, या घटनेवर पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवत अभिनेत्री डिंपल हयाती आणि डेविड यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेनुसार कलम ७४, ७९, ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणी दोघांना नोटीस पाठवली असून चौकशीसाठी बोलावले आहे. अद्याप चौकशी झाली नाही.