विवाहितेच्या छळप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 16:20 IST2018-11-06T16:18:34+5:302018-11-06T16:20:34+5:30

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू, नणंद अशा चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

case register against four for harnessing women | विवाहितेच्या छळप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

विवाहितेच्या छळप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

पिंपरी : विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू, नणंद अशा चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध सोमवारी गुन्हा दाखल झाला असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
 
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लॉडियस जोसेफ घनम (पती), रोजमेरी जोसेफ घनम (सासू),जेनिफर पिल्ले , सप्रिना डिसोजा (दोघी नणंद) या चौघांविरूद्ध भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. २००७ ला विवाह झाल्यापासून ते अद्यापपर्यंत विवाहितेचा वारंवार छळ केला जात होता. वेळोवेळी शिवीगाळ, मारहाण केली जात होती. उपाशी ठेवले जात होते. मानसिक, शारिरिक छळ केल्याप्रकरणी अखेर महिलेने सासरच्या मंडळीविरूद्ध पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: case register against four for harnessing women