शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

नगरसेवकाच्या भावाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 8:44 PM

जमीन मालक मयत असताना त्यांच्या नावे विक्री करारनामा नोंदणी प्रकरण

ठळक मुद्देउत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तोतया व्यक्ती उभ्या करुन विक्री करारनाम्याची दुय्यम निबंधक कार्यालया नोंदणी करण्यात आली आहे.

मीरारोड - जमीन मालकांचे निधण झाले असताना त्यांच्या जागी तोतया व्यक्ती उभ्या करुन विक्री करारनाम्याची दुय्यम निबंधक कार्यालया नोंदणी करण्यात आली आहे. सदर जमीन खरेदी करणारा नगरसेवकाचा भाऊ अमिर गफार शेख रा. केजीएन हाऊस, उत्तन याच्यासह नोंदणीकृत करारनाम्या आधारे सातबारा नोंदी फेरफार करणारे तत्कालिन तलाठी व दोन तोतया व्यक्तीं विरोधात उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भाईंदरच्या उत्तन येथील सर्व्हे क्र. २३७ हिस्सा क्र. १७ ह्या सुमारे १० गुंठे जमीनीचे मुळ मालक अब्दुल करीम शेख होते. त्यांचे २१ एप्रिल २००१ रोजी तर त्यांची पत्नी खतीजा यांचे ६ जुन १९९७ रोजी निधन झाले आहे. त्यांना ८ मुलं - मुली वारस असुन त्यातील दोन वारसांचे निधन झाले आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांच्या जिवंत वारसदारांनी सदर जमीनीच्या विकास आणि विक्रीचे अधिकार नोटरीद्वारे एहसान गफार राजपुत (४४) रा. गोविंद नगर, मीरारोड यांना दिले.परंतु सदर जमीनीवर नगरसेवक अमजदचा भाऊ अमिर गफार शेख हा आपला हक्क सांगत होता. सात बारा नोंदी सुध्दा अमिरचे नाव लागले होते. एहसान यांनी तलाठी कार्यालयात याची चौकशी केली असता खरेदीखत, नोंदणीकृत करारनामा आदी कागदपत्रं मिळाली. त्यामध्ये अब्दुल शेख व हनिफ माजिद यांच्या कडुन २४ फेब्रुवारी २००९ रोजी अमिरने सदर जमीन दुय्यम निबंधक कार्यालय क्र. ७ मध्ये रीतसर नोंदणी करुन खरेदी केल्याचे कागदपत्र आढळुन आले.वास्तविक अब्दुल हे एयरइंडिया मध्ये नोकरी करत होते व २१ एप्रिल २००१ रोजी त्यांचे निधन झाले असताना व तसा मृत्युच दाखला असताना त्यांच्या व हनिफ माजिदच्या नावे दोन खोट्या व्यक्ती उभ्या करुन निबंधक कार्यालयात करारनामा नोंदणी केल्या बद्दल एहसान यांनी २३ फेब्रुवारी रोजी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. त्या करारनाम्याच्या आधारे तत्कालिन तलाठी गणेश भुताळे यांनी जमीनीचे फेरफार करुन ७/१२ नोंदी अमिर याचे नाव घेतले. फेरफार करताना भुताळे यांनी सुचना नोटीसवर करारनाम्यातील त्याच दोन बोगस व्यक्तींच्या सह्या आणि अंगठे घेतले. या प्रकरणी पोलीसांनी अमिर सह भुताळे व अन्य दोन बोगस व्यक्तीं विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जमीन खरेदी - विक्री व्यव्हाराचा नोंदणीकृत करारनामा सादर केला गेला होता. त्या आधारेच मालकी हक्क ठरल्याने फेरफार करण्यात आला होता. करारनामा नोंदणीकृत असल्याने आपण फेरफार केला. यात आपला काही संबंध नसुन पोलीसांनी सखोल चौकशी करुन न्याय्य निर्णय घ्यावा असे भुताळे म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी