शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

‘गाडी चुराने का तरीका’ आला अंगाशी : मोटारी चोरणारा जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 9:57 PM

त्याने चोरलेल्या गाड्या स्वत : फिरण्यासाठी वापरल्या. तर आलिशान मोटारीचा वापर त्याने हडपसर सोलापूर वाहतुकीसाठी केला.

ठळक मुद्देयुट्यूबवरील व्हिडिओ पाहून मोटारी चोरणारा जेरबंदकोल्हापूरच्या ३ मोटारी, ५ मोबाईल जप्त : गुंडा स्कॉडची कामगिरी

 पुणे : यु ट्युबवरील गाडी चोरण्याचा व्हिडिओ पाहून कोल्हापूर येथून आलिशान मोटारी चोरणाऱ्याला पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या गुंडा स्कॉड उत्तर विभागाने पकडले आहे़ त्याच्याकडून ३ मोटारी व ५ मोबाईल जप्त करण्यात आले़ रेवण सोनटक्के (वय २०, रा़ महंमदवाडी, हडपसर) असे त्याचे नाव आहे.  

        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडा स्कॉड उत्तर विभागाचे पोलिस निरीक्षक अंजूम बागवान व त्यांचे पथकातील कर्मचारी बुधवारी खडकी परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासत असताना  मुळा रोड येथे रस्त्याच्या कडेला एक आलिशान मोटार संशयास्पदरित्या उभी असल्याचे आढळले. त्यावेळी गाडीत बसलेल्या व्यक्तीकडे चौकशी केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला़ त्यामुळे त्याच्याकडे मोटारीची चौकशी केल्यावर ती चोरीची असल्याचे आढळून आले़ अधिक चौकशीत त्याने ही मोटार ही गाडी कोल्हापूर येथील गॅरेजमधून चोरली असल्याचे सांगितले. त्यानंतर अशा प्रकारे त्याने  कोल्हापूर  व सांगलीतून २ मोटारी चोरल्याचे कबूल केले. त्याच्याकडून तीन चारचाकी व ५ मोबाईल जप्त केले. 

          सोनटक्के याला विचारले असता त्याने कबूल केले की,  युट्यूबवर गाडी चुराने का तरीकाच्या व्हिडिओ क्लीप पाहिली होती़ त्यात दाखविल्या प्रमाणे तो चोऱ्या  करीत होता़ गाड्या गॅरेजमध्ये दिल्यानंतर  मेकॅनिक गाडीची चावी गॅरेजमध्ये किबोर्डवर ठेवत होता. त्यावेळी तेथे गाडी दुरुस्तीच्या बहाण्याने जाऊन चावी चोरायचा. त्यानंतर नंतर रात्री त्या चावीच्या मदतीने गाडी चोरून निघून जायचा. त्याने चोरलेल्या गाड्या स्वत : फिरण्यासाठी वापरल्या. तर आलिशान मोटारीचा वापर त्याने हडपसर सोलापूर वाहतुकीसाठी केला. अशाच अलिशान मोटारीचा नगर रोडवर शिरुरजवळ अपघात झाल्याने सोडून दिली होती. तर त्याने यापूर्वी शिवाजीनगर व बसस्थानक परिसरात मोबाईल चोरी केली होती. त्याला आॅगस्ट २०१७ मध्ये मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती़  ही कारवाई पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक पोलिस निरीक्षक गणेश पवार, कर्मचारी नरेंद्र सोनवणे, भालचंद्र बोरकर व इतर कर्मचारी यांच्या पथकाने केली. 

टॅग्स :PuneपुणेtheftचोरीPoliceपोलिसArrestअटकkolhapurकोल्हापूर