शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या भरधाव वेगामुळे कारचा अपघात 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 9:04 PM

ओशिवरा पोलीस ठाण्यात रॅश ड्राइव्हिंगप्रकरणी गुन्हा दाखल 

मुंबई - ओशिवरा पोलीस ठाण्याच्या समोरच्या रोडवर म्हणजेच न्यु लिंक रोडवर बालिका वधू आणि दिल ले दिल तक या हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या कारचा (एमएच ०२, इआर १२१२) अपघात झाला आहे. अपघातात तीन अन्य चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले असून सिद्धार्थची बीएमडब्ल्यू कार अपघातात डिव्हाडरवर चढली. याप्रकरणी बेजबाबदारपणे भरधाव वेगाने गाडी चालवल्यामुळे ओशिवरा पोलीस ठाण्यात सिद्धार्थ शुक्लाविरोधात भा. दं. वि. कलम २७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासालवाड यांनी दिली. 

सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सिद्धार्थ शुक्लाच्या कारने भरधाव वेगाने येऊन तीन गाड्यांचे नुकसान करत डिव्हाडरवर चढली. ओशिवरा पोलीस ठाण्यासमोर असलेल्या श्रीजी हॉटेलसमोरच हा अपघात झाला. या अपघातादरम्यान श्रीजी जंक्शन ते मेघा लिंक रोडवरील वाहतूक थोड्यावेळासाठी बंद करण्यात आली होती. या अपघातात सिद्धार्थ किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सिद्धार्थ रुग्णालयात नेण्यात आले होते. हि ड्रंक अँड ड्राईव्हची केस नसून रॅश ड्राईव्हिंगची केस असल्याचे पासालवड यांनी सांगितले. 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईAccidentअपघातAndheriअंधेरी