अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईलमध्ये दरोडा पडला. मास्क घातलेले २५ सशस्त्र दरोडेखोर सॅन रेमनमधील हेलर ज्वेलर्समध्ये घुसले आणि त्यांनी १ मिलियनपेक्षा जास्त (जवळपास ९ कोटी रुपये) किमतीचे हिरे, दागिने आणि सोनं लुटलं. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे.
संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये हातोडा, बॅग आणि बंदुका घेऊन दरोडेखोर दुकानात प्रवेश करताना स्पष्ट दिसत आहेत. त्यांनी काचेची कपाटं फोडली आणि मौल्यवान दागिने चोरले. अचानक घडलेल्या या घटनेने उपस्थित असलेले लोक खूप घाबरले.
न्यू यॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, सॅन रेमन पोलीस विभागाचे लेफ्टनंट माइक पिस्टेलो म्हणाले की, दरोडेखोर दुकानात प्रवेश करताच दरवाजा आपोआप लॉक झाला. २०२३ मध्ये झालेल्या दरोड्यानंतर हे सुरक्षा फीचर लावण्यात आलं होतं. त्यांनी आत प्रवेश केल्यानंतर दुकान पूर्णपणे ताब्यात घेतले आणि सर्व दागिने चोरले.
दरवाजा बंद होता, ज्यामुळे ते काही काळ आत अडकले. त्यांनी बाहेर पडण्यासाठी गोळीबार केला आणि दुकानाचा दरवाजा तोडण्यात यशस्वी झाले. पार्किंगमध्ये आधीच सहा वाहनं उभी होती, ज्याच्या मदतीने सर्व दरोडेखोर पळून गेले. ड्रोन फुटेजमध्ये ते गाड्यांमध्ये पळून जाताना दिसत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. एका अल्पवयीन मुलासह सात संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी पळून जाण्यासाठी वापरलेली वाहनं देखील जप्त केली आहेत.
Web Summary : A California jewelry store was robbed by 25 masked thieves who stole over $1 million worth of jewelry. The robbers used multiple vehicles and firearms. Police apprehended seven suspects, including a minor, and seized getaway cars. No injuries were reported.
Web Summary : कैलिफ़ोर्निया के एक ज्वैलरी स्टोर में 25 नकाबपोश चोरों ने 1 मिलियन डॉलर से अधिक के गहने चुरा लिए। चोरों ने कई वाहनों और हथियारों का इस्तेमाल किया। पुलिस ने एक नाबालिग सहित सात संदिग्धों को पकड़ा और भागने वाली कारों को जब्त कर लिया। कोई घायल नहीं हुआ।