पुण्यातील नऱ्हेमध्ये हॉटेल चालकाचा डोक्यात धारदार हत्याराने वार करत निर्घृण खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 21:34 IST2020-06-12T21:31:55+5:302020-06-12T21:34:23+5:30

खून झालेल्या व्यक्तीचा नऱ्हे परिसरात छोटासा हॉटेल व्यवसाय असून ते गॅसच्या टाक्या पुरविण्याचे काम देखील करत असत.

The brutal murder of a hotel driver in Narhe; | पुण्यातील नऱ्हेमध्ये हॉटेल चालकाचा डोक्यात धारदार हत्याराने वार करत निर्घृण खून

पुण्यातील नऱ्हेमध्ये हॉटेल चालकाचा डोक्यात धारदार हत्याराने वार करत निर्घृण खून

ठळक मुद्देअज्ञात कारणावरून त्यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार

धायरी: अज्ञात कारणावरून नऱ्हे परिसरात एका इसमाच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. सुनील बारकु लांगोरे (वय ,४५, रा. अभिनव कॉलेज रस्ता, नऱ्हे, मूळ - नांदोशी, ता. हवेली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. 

सुनील लांगोरे ह्यांचे नऱ्हे परिसरात छोटासा हॉटेल व्यवसाय असून त्याचबरोबर ते गॅसच्या टाक्या पुरविण्याचे काम करीत असत. सध्या लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसाय बंद असला तरी ते हॉटेलच्या आवारात गॅसच्या पावत्या बनविणे तसेच गॅस घरपोच देण्याचे काम करीत असत. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब मूळ गावी नांदोशी या ठिकाणी गेले असल्याचे समजते. त्यामुळे सध्या ते एकटेच राहत होते. सायंकाळी सहाच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी त्या ठिकाणी येऊन अज्ञात कारणावरून त्यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार केले. ह्यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांनी घटनास्थळी तत्काळ भेट दिली असून खुनाबाबत सिंहगड रस्ता पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: The brutal murder of a hotel driver in Narhe;