Brother was killed by sister husband due to normal quarrel | दाजीनेच आपल्या मेव्हण्याच्या डोक्यात लाकडी बांबूने वार करून केला खून

दाजीनेच आपल्या मेव्हण्याच्या डोक्यात लाकडी बांबूने वार करून केला खून

ठळक मुद्देअल्पबचत भवनासमोरील क्वीन्स गार्डन मधील झाडीत रेल्वे पटरीच्या बाजूला घडली घटना

पुणे : घरातून निघून गेलेल्या पत्नीचा शोध घेताना त्यातून झालेल्या वादातून दाजीनेच आपल्या मेव्हाण्याच्या डोक्यात लाकडी बांबूने वार करून खून केला. अल्पबचत भवनासमोरील क्वीन्स गार्डन मधील झाडीत रेल्वे पटरीच्या बाजूला ही घटना घडली. अक्षय दिनेश कुलकर्णी (रा.कोथरुड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी आरोपी दाजी संतोष मंचाराम चव्हाण (वय.25,मुळ नागपूर, सध्या दारुवाला पुल) याला ताब्यात घेतलेले आहे.  
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष चव्हाण याची पत्नी घरातून न सांगता निघून गेली होती. त्यामुळे मेव्हणा अक्षय व दाजी संतोष हे दोघे तिचा शोध घेत होते.  शोध घेत असताना दोघांची त्याच कारणातून भांडणे झाली. यावेळी आरोपी चव्हाण याने अक्षयला लाकडी बांबूने मारहाण केली. त्यात तो बेशुद्ध  होऊन जागेवरच मृत झाला. त्यानंतर चव्हाण याने अक्षयचा मृतदेह तेथील कच-याच्या ढिगा-यात झाकून टाकला. दोन - चारच दिवसांनी आरोपी चव्हाण याने पोलिस ठाण्यात हजर होऊन खून केल्याची कबुली दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, मृतदेह मिळून आला असून तो  शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. पुढील तपास गुन्हे शाखा युनिट दोन व कोरेगाव पोलिस करीत आहेत.  
 

Web Title: Brother was killed by sister husband due to normal quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.