"मम्मी घरी चल, सरप्राईझ द्यायचंय", भावाने केली सख्ख्या बहिणीची हत्या, आईवरही जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 16:05 IST2026-03-09T16:04:28+5:302026-03-09T16:05:52+5:30

हार्दिक नावाच्या तरुणाने आपली जुळी बहीण हिमशिखाची हत्या केली.

brother stabs twin sister in moradabad and attacks mother over failed love affair | "मम्मी घरी चल, सरप्राईझ द्यायचंय", भावाने केली सख्ख्या बहिणीची हत्या, आईवरही जीवघेणा हल्ला

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये हार्दिक नावाच्या तरुणाने आपली जुळी बहीण हिमशिखाची हत्या केली. गुरुग्रामहून होळी साजरी करण्यासाठी घरी आलेल्या हार्दिकने घरात असलेल्या बहिणीवर ४० पेक्षा जास्त वार केले आणि तिचा मृतदेह चादरीत गुंडाळून बेडवर ठेवला. त्यानंतर तो ऑफिसला गेलेल्या आपल्या आईला 'सरप्राईझ' देण्याच्या बहाण्याने घरी घेऊन आला आणि तिच्यावरही चाकूने सहा वार केले. आरडाओरडा ऐकून पोहोचलेल्या शेजाऱ्यांनी जखमी आईला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, ज्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र हिमशिखाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

बहिणीची हत्या केल्यानंतर हार्दिक आपल्या आईच्या ऑफिसमध्ये पोहोचला, ज्या एका विमा कंपनीत असिस्टंट मॅनेजर आहेत. तिथे त्याने प्रेमाने म्हटलं, "मम्मी घरी चल, तुला एक सरप्राईझ द्यायचं आहे." काहीही कल्पना नसलेली आई जेव्हा घरी पोहोचली, तेव्हा तिथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मुलीचा मृतदेह पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आई ओरडत असतानाच हार्दिकने तिच्यावरही हल्ला केला. सध्या आई रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे, तर मुलगा जेलमध्ये आहे.

पोलीस तपासात समोर आलं आहे की, हार्दिकने बी.टेक केल्यानंतर आधी गुगलमध्ये नोकरी केली होती, परंतु वर्षभरापूर्वी त्याने नोकरी सोडून तो यूट्यूबर बनला होता. पुण्याच्या एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. सात महिन्यांपूर्वी झालेल्या ब्रेकअपनंतर तो मानसिकदृष्ट्या अस्थिर आणि रागीट झाला होता. आपलं नातं तुटण्यामागे आई आणि बहिणीचा हात असल्याचा संशय त्याला होता. याच द्वेषातून त्याने हे कृत्य केलं.

हिमशिखाच्या शवविच्छेदन अहवालाने सर्वांनाच धक्का बसला आहे. संतापलेल्या भावाने बहिणीच्या शरीरावर ४० हून अधिक वार केले होते. हिमशिखा स्वतः एका आयटी कंपनीत असिस्टंट मॅनेजर होती आणि पुढील शिक्षणही घेत होती. हार्दिकने चौकशीदरम्यान कबूल केलं की, त्याला अचानक राग अनावर झाला आणि त्याने स्वयंपाकघरातील मोठा चाकू उचलून बहिणीवर हल्ला केला.

Web Title : भाई ने बहन की हत्या की, माँ पर हमला: यूपी में 'सरप्राइज' जानलेवा

Web Summary : यूपी में, एक व्यक्ति ने अपनी जुड़वां बहन को 40 से अधिक बार चाकू मारकर हत्या कर दी और अपनी माँ को गंभीर रूप से घायल कर दिया, उसे शक था कि उनका ब्रेकअप में हाथ है। उसने अपनी माँ को 'सरप्राइज' के बहाने घर बुलाया और फिर उस पर हमला कर दिया। माँ अस्पताल में है, बेटा गिरफ्तार।

Web Title : Brother Kills Sister, Attacks Mother: 'Surprise' Turns Deadly in UP

Web Summary : In UP, a man killed his twin sister with over 40 stabs and severely injured his mother, suspecting their involvement in his breakup. He lured his mother home under the guise of a surprise before attacking her. The mother is hospitalized, and the son is arrested.