Brother stabbed his brother, incident in Mankapur | सख्ख्या भावाने भावाला चाकूने भोसकले, मानकापूरातील घटना

सख्ख्या भावाने भावाला चाकूने भोसकले, मानकापूरातील घटना

ठळक मुद्देराजू नारायण मांगे (वय ५०, धम्मदीप बुद्ध विहार जवळ झिंगाबाई टाकळी) हे रविवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास सायकलने कामावर जात होते.

नागपूर : वडिलोपार्जित मालमत्तेवरून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या दोन भावांमधील वादाचा सोमवारी रात्री भडका उडाला. एका भावाने त्याच्या सख्ख्या भावाला चाकूने भोसकले. त्यामुळे शेख अमिन नामक व्यक्ती गंभीर जखमी झाला. सोमवारी रात्री १० ते १०.१५ च्या सुमारास मानकापूर पोलीस ठाण्याच्या  हद्दीतील  जय नगरात ही घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला होता.

जखमी आमिनला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. माहिती मिळाल्यानंतर मानकापूरचा पोलीस ताफा, गुन्हे शाखेचा ताफा आणि परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त विनिता शाहू घटनास्थळी पोहोचल्या.
 
वृत्त लिहिस्तोवर आरोपी हाती लागला नव्हता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आली होती.

Web Title: Brother stabbed his brother, incident in Mankapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.