शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
2
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
3
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
4
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
5
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
6
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
7
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
8
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
9
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
10
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
11
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
12
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
13
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
14
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
15
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
16
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
Daily Top 2Weekly Top 5

Breaking : खळबळजनक! १९९३ साखळी बॉम्बस्फोटातील दोषी युसूफ मेमनचा कारागृहात झाला मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 16:00 IST

मृतदेह धुळे येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

ठळक मुद्दे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले.1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात तब्बल 257 लोकांचा मृत्यू झाला.

नाशिक - १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी असलेला युसूफ मेमनचा नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला. या घटनेने अंडरवर्ल्ड जगतात खळबळ माजली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले. मृतदेह धुळे येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अंडरवर्ल्ड डॉन टायगर मेमनचा युसूफ मेमनचा भाऊ आहे. गेल्या २ वर्षांपासून युसूफ मेमन शिक्षा भोगत होता. आज सकाळी त्याचा हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू झाला. 

 

१९९३ मुंबईच्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी युसुफ मेमन  (54) याला शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह त्रास होऊ लागल्याने त्यात जिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले. मात्र, हृदयविकाराच्या झटक्याने मेमन याचे निधन झाले. औरंगाबाद कारागृहातून 2018 मध्ये नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह रवानगी करण्यात आली होती. औरंगाबाद कारागृहाच्या पूर्वी मेमन १९९३ पासून मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत होता. १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या  युसुफ अब्दुल रज्जाक मेमनचा शुक्रवारी (दि.२६) दुपारी जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. २०१८ सालापासून मेमन नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत होता. युसुफच्या मृतदेहाचे शवविच्छेदन धुळे येथील शासकिय महाविद्यालयात केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

याबाबत कारागृह प्रशासनाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मुंबईत १९९३साली झालेल्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी तथा इब्राहीम मुश्ताक मेमन उर्फ टायगर मेमन आणि याकुब मेमनचा भाऊ असलेला युसुफ मेमन देखील या बॉम्बस्फोटात दोषी आढळून आला होता. औरंगाबाद कारागृहातून युसुफला २०१८ साली नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले होते. मागील दोन वर्षांपासून तो या कारागृहात शिक्षा भोगत होता. शुक्रवारी सकाळी कारागृहात युसुफला श्वासोच्छवासाकरिता त्रास होऊ लागल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्याला तत्काळ पोलीस वाहनातून कारागृह प्रशासनाने जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले; मात्र उपचारादरम्यान युसुफला वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले,अशी माहिती कारागृह अधिक्षक प्रमोद वाघ यांनी दिली. हृदयविकाराच्या झटक्याने युसुफचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात आहे.

युसुफ हा औरंगाबाद कारागृहात येण्यापुर्वी मुंबईच्या आर्थररोड कारागृहात शिक्षा भोगत होता. दाऊद टोळीशी संबंधित युसुफला १९९३च्या बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आली होती. दहशतवादी कृत्य घडवून आणल्याचा ठपका याकुब, युसुफ मेमनवर न्यायालयाने ठेवला होता. टायगरचा धाकटा तर युसुफचा मोठा भाऊ याकुबला २०१५ साली नागपूरमधील तुरूंगात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. १९९३ बॉम्बस्फोट हा साखळी स्फोट मोठा होता.एकूण १२ स्फोट झाले होते आणि स्फोटाच्या आजूबाजूला रक्ताचा सडा वाहू लागले होते. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात तब्बल 257 लोकांचा मृत्यू झाला.

Tiger Memon

12 मार्च, 12 स्फोट: 1993 मध्ये कुठे आणि कसे स्फोट झाले?

पहिला स्फोट : 12 मार्चच्या दुपारी मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीबाहेर दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी देशाला हादरवणारा पहिला बॉम्बस्फोट झाला

दुसरा स्फोट : दुपारी 2.15 वाजता, नरसी नाथ स्ट्रीटतिसरा स्फोट : दुपारी 2.30 वाजता, शिवसेना भवनचौथा स्फोट : दुपारी 2.33 वाजता, एयर इंडिया बिल्डिंगपाचवा स्फोट : दुपारी 2.45 वाजता, सेंच्युरी बाजारसहावा स्फोट : दुपारी 2.45 वाजता, माहिमसातवा स्फोट : दुपारी 3.05 वाजता, झवेरी बाजारआठ स्फोट : दुपारी 3.10 वाजता, सी रॉक हॉटेलनववा स्फोट : दुपारी 3.13 वाजता, प्लाझा सिनेमादहावा स्फोट : दुपारी 3.20 वाजता, जुहू सेंटॉर हॉटेलअकरावा स्फोट : दुपारी 3.30 वाजता, सहार विमानतळबारावा स्फोट : दुपारी 3.40 वाजता, विमानतळ सेंटॉर हॉटेल 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! १६ वर्षांच्या TikToker तरुणीची आत्महत्या; रात्री मॅनेजरशी गाण्याबद्दल बोलली, अन्...

 

धक्कादायक! हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून महिलेने मुलीला गळफास लावून स्वतःही केली आत्महत्या

 

उसन्या पैशाचा तगादा लावल्याने भाजीवाल्याची तारेने गळा आवळून हत्या 

 

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

 

लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल

टॅग्स :Blastस्फोटMumbaiमुंबईDeathमृत्यूHeart Attackहृदयविकाराचा झटका