Breaking : नील सोमय्या यांना दणका, कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 16:59 IST2022-03-01T16:58:44+5:302022-03-01T16:59:30+5:30

Neil Somayya : "बाप बेटे जेल जाएंगे"असं म्हणत शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांनंतर नील सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली.

Breaking: Neil Somaiya beaten, court rejects anticipatory bail | Breaking : नील सोमय्या यांना दणका, कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला

Breaking : नील सोमय्या यांना दणका, कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला

मुंबई - भाजपाचे नेते नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सत्र न्यायालयाने निर्णय घेतला आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांचा  अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे नील सोमय्या यांना न्यायालयाने दणका दिला आहे

"बाप बेटे जेल जाएंगे"असं म्हणत शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांनंतर नील सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली. 'निकॉन इन्फ्रा'च्या माध्यमातून अनेक ठिकाणी जमिनी बाजारभावापेक्षा कमी दरात मिळवल्याचा संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत आरोप केला होता.   

या पत्रकार परिषदेत त्यांनी किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांचे संबंध असल्याचा दावा करत आरोप केला होता. यानंतर संजय राऊत यांनी बाप बेटे दोनो जेल मे जाएंगे असं म्हटलं होतं. यानंतर नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावार सुनावणी पूर्ण झाली आहे. नील सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मंजूर होणार का याचा निर्णय आज जाहीर होणार होता. या निर्णयाकडे किरीट सोमय्या, नील सोमय्या आणि भाजपसह शिवसेनेचं लक्ष लागलं होतं. अखेर आज न्यायालयाने निर्णय देत नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. 

Web Title: Breaking: Neil Somaiya beaten, court rejects anticipatory bail