Breaking : MNS vice-president murder with a sharp weapon in ambernath | Breaking : खळबळजनक! मनसेच्या उपशहराध्यक्षाची भररस्त्यात धारदार शस्त्राने केली हत्या

Breaking : खळबळजनक! मनसेच्या उपशहराध्यक्षाची भररस्त्यात धारदार शस्त्राने केली हत्या

ठळक मुद्देहत्येचे कारण शोधून आरोपींना अटक करण्यासाठी पोलीसांचे पथक तयार करण्यात आले आहे.मनसेचे उपशहराध्यक्ष राकेश पाटील अंबरनाथ प्राचिन शिवमंदिरच्या पुजारी कुटुंबातील असून अंबरनाथ गांव आणि परिसरात त्यांचे चांगले वर्चस्व होते. 

अंबरनाथ - अंबरनाथच्यामनसे उपशहराध्यक्ष राकेश पाटील यांची भर रस्त्यात हत्या करण्यात आली आहे. चार हल्लेखोरोंनी धारधार शस्त्राचा वापर करुन त्याची हत्या केली आहे. जखमी अवस्थेत पाटील यांना कल्याणच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट नाही. मनसेचे उपशहराध्यक्ष राकेश पाटील अंबरनाथ प्राचिन शिवमंदिरच्या पुजारी कुटुंबातील असून अंबरनाथ गांव आणि परिसरात त्यांचे चांगले वर्चस्व होते. 

 

राकेश पाटील यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने प्रभागात चांगले काम देखील सुरु होते. अंबरनाथ गांव आणि परिसरात नव्याने विकसीत झालेल्या इमारतींना भेडसावरणा-या समस्यांवर त्यांचे चांगले काम देखील सुरु होते. नव्याने विकसित होत असलेल्या वस्तीकडे पालिकेचे आणि बांधकाम व्यवसायीकांचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड त्यांची होती. या सोबतच त्यांचा या भागातिल नागरिकांसोबत चांगले संबंध निर्माण झाले होते. बुधवारी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान पाटील हे अंबरनाथ गांव आणि पाले गांव यांच्या मध्यावर नव्याने विकासीत झालेल्या संकुलाजवळ कामानिमित्त गेलेले असतांना चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारधार शस्त्रने हल्ला चढविला. पाटील यांनी त्यांचा प्रतिकार देखील करण्याचा प्रय} केला. मात्र या हल्लयात पाटील गंभीर जखमी झाले होते. त्यांना लागलीच रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती गावात कळताच गावातील वातावरण तंग झाले आहे.


दरम्यान, या हत्येप्रकरणी पोलीसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. हत्येचे कारण शोधून आरोपींना अटक करण्यासाठी पोलीसांचे पथक तयार करण्यात आले आहे. हत्येनंतर लागलीच शहरात बंदोबस्त लावण्यात आला आहे. दुसरीकडे या हत्येनंतर मनसेच्या वतीने देखील तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

Web Title: Breaking : MNS vice-president murder with a sharp weapon in ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.