मुलगा पहाटे व्यायामासाठी उठला अन् पाहतो तर काय वडिलांनी लावून घेतला होता गळफास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 14:16 IST2021-11-25T13:28:41+5:302021-11-25T14:16:28+5:30
Suicide Case : संजय यांच्या पश्चात पत्नी सविता राकेश आणि नितीन हे दोन मुले तर विवाहित मुलगी प्रियंका असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

मुलगा पहाटे व्यायामासाठी उठला अन् पाहतो तर काय वडिलांनी लावून घेतला होता गळफास
जळगाव : कुटूंब घरात झोपलेले असताना बाहेर वेल्डींग दुकानाच्या शेडमध्ये संजय नारायण मिस्त्री (वय ५०) यांनी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी तालुक्यातील शिरसोली प्र.न.येथे उघडकीस आली. संजय यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, मुलगा पहाटे साडे पाच वाजता व्यायाम करण्यासाठी उठला असता त्याला वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय मिस्त्री हे वेल्डिंगचे कामे करायचे. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर पत्नी सविता, मुलगा राकेश व नितीन असे रात्री १२ वाजता झोपले तर संजय हे घराच्या बाहेर झोपले होते. पहाटे साडे पाच वाजता राकेश व्यायाम करण्यासाठी तर लहान मुलगी नितीन पाण्याचे हिटर लावण्यासाठी उठला असता ही घटना उघडकीस आली. पोलीस पाटलाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयात रवाना केला. वैद्यकिय अधिकारी डॉ.सचिन अहिरे यांनी त्यास मृत घोषीत केले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हवालदार अल्ताफ पठाण व शुध्दोधन ढवळे यांनी पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
संजय यांच्या पश्चात पत्नी सविता राकेश आणि नितीन हे दोन मुले तर विवाहित मुलगी प्रियंका असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.